वेळू येथे 39.75 लाख रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
भोर : वेळू येथील श्रीजी इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंगमध्ये वीजमीटर प्रणालीमध्ये फेरफार करून अनधिकृत वीज वापर केल्याच्या आरोपावरून निमांशु दिनेश राठोड यांच्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत एकूण 2 लाख 10 हजार 748 युनिट्सची वीजचोरी झाल्याचे आढळल्याचा आरोप आहे. यामुळे महावितरण कंपनीचे 39 लाख 75 हजार 640 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित ग्राहकाचा मंजूर वीजभार 20.79 किलोवॅट असताना तपासणीदरम्यान 100.221 किलोवॅट जोडभार आढळल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 445/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आणि राणे करीत आहे.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
