ताज्या घडामोडीभोरराजगड पोलीस

जमिनीच्या वादातून वजनकाटा व्यावसायिकाला कोयता, लोखंडी रॉडने मारहाण!


मंगेश पवार

भोर तालुक्यातील निगडे येथील साई धर्मकाट्यावर जमिनीच्या वादातून एका व्यावसायिकाला कोयता, लोखंडी रॉड आणि बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 437/2026 अन्वये सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निशिकांत उदयसिंग मांढरे (वय 52, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) हे 11 ऑक्टोबर 2026 रोजी नेहमीप्रमाणे निगडे येथील साई धर्मकाट्यावर आले असताना ही घटना घडली.

 

यावेळी आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली सिताराम पांगारकर, आकाश पांगारकर, सागर पांगारकर व त्यांच्यासोबत आलेल्या अन्य तीन ते चार जणांनी कार्यालयात प्रवेश केला. शर्टाच्या मागे लपवून आणलेल्या कोयत्याने, लोखंडी रॉडने व बांबूने फिर्यादी यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या तळहातावर दुखापत झाली.

 

तसेच, भावाकडून विकत घेतलेली जमीन आमच्या नावावर करून दे, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर आरोपी स्कॉर्पिओ आणि नंबरप्लेट नसलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून घटनास्थळावरून निघून गेले.

 

या प्रकरणी 19 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.53 वाजता राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर निंबाळकर करीत आहेत.


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *