ताज्या घडामोडीभोरराजगड पोलीस

वर्वे येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लंपास! कारमध्ये बसवून तीन अनोळखी महिलांकडून जबरी चोरी;


मंगेश पवार

भोर तालुक्यातील वर्वे खुर्द येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून लिफ्ट घेताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलाबाई तुकाराम भोरडे (वय ६५, रा. वर्वे खुर्द, ता. भोर, जि. पुणे) या २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावरील वर्वे गावच्या हद्दीतील सर्व्हिस रोडवर उभ्या होत्या.

 

यावेळी कारमधून आलेल्या अनोळखी तीन महिलांनी त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमधील महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने त्यांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि कारमधून निघून गेल्या.

 

या चोरीमध्ये काळे मणी ओवलेले तीन पदरी सोन्याचे डोरले अंदाजे ९० हजार रुपये किमतीचे, तसेच सोन्याचे गंठण अंदाजे ८० हजार रुपये किमतीचे, असे एकूण १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.

 

याप्रकरणी फुलाबाई भोरडे यांच्या फिर्यादीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) अन्वये अनोळखी तीन महिला व एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास सपोफौ काळे करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *