भोर तालुका वडार समाज संघटनेची बैठक उत्साहात संपन्न
भोर तालुका वडार समाज संघटनेची बैठक संगमनेर (ता. भोर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. तालुक्यातील वडार समाज बांधवांना एकत्र आणून समाजाची एकजूट अधिक मजबूत करणे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करणे, समाजातील विविध प्रश्नांवर विचारविनिमय करणे तसेच संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला भोर तालुक्यातील विविध गावांतील समाज बांधव उपस्थित होते. बैठकीदरम्यान समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. समाजातील तरुणांना संघटित करणे, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे, गावागावातून संघटनेची शाखा स्थापन करणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला संघटनेच्या माध्यमातून जोडून घेणे याबाबत चर्चा करण्यात आली.
समाजहिताचे ध्येय समोर ठेवून भविष्यात भोर तालुक्यातील प्रत्येक गावात वडार समाजाची शाखा उभारण्यासह समाजबांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि संघटनेची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. ‘जय बजरंग, जय वडार’ या घोषणांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. समाजाची एकजूट, संघटनात्मक बळकटी आणि सामाजिक प्रगती यांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.
या बैठकीस ज्ञानेश्वर भोसले, गणेश मोरे, भारत पवार, शांताराम पवार , अंकुश शिंदे, नामदेव धोत्रे, दीपक पवार, सतीश जाधव, मयूर मांजरे, आदित्य माने, विजय पवार, रामभाऊ देवकर, लक्ष्मण देवकर, दिगंबर घोले, दिपक धोत्रे, कैलास लष्कर यांच्यासह विविध गावांतील समाज बांधव उपस्थित होते.

संपादक : मंगेश राजेंद्र पवार
