ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

कापूरहोळ येथे स्वच्छता मोहीम; ‘भोरचा बगळ्याभाऊ’ व सहकाऱ्यांचा विशेष सत्कार


सारोळा : भोर तालुक्यातील नऱ्हे येथील रहिवासी तथा सोशल मीडियावर ‘भोरचा बगळ्याभाऊ’ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवदत्त वीर यांनी स्वच्छता मोहिमेद्वारे समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी कापूरहोळ, कामथडी, कासुर्डी, मोहरी, निगडे, धांगवडी, आळंदेवाडी, नऱ्हे तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये बसथांबे, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांच्या कडेला पडलेला कचरा गोळा करून साफसफाई केली आहे.

 

या उपक्रमात यश गोळे आणि सार्थक वीर हे युवक त्यांना सातत्याने सहकार्य करीत आहेत. नुकतीच शिवदत्त वीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कापूरहोळ परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ केला. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत कापूरहोळमधील काही तरुणांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

 

सुशिक्षित असलेले शिवदत्त वीर यांना स्वच्छतेची विशेष आवड असून, ज्या ठिकाणी साफसफाईची गरज भासेल तेथे भविष्यातही स्वयंस्फूर्तीने काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कार्यामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचत आहे.


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *