ताज्या घडामोडीराजगड पोलीस

वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल


 

भोर : भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगमध्ये अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणी लॉज चालकासह अन्य एका तरुणाविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास आमराई रिसॉर्ट लॉजिंग, वेळू येथे ही कारवाई करण्यात आली. लॉज चालक रघू शेट्टी (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) आणि वैभव बालाजी इंगळे (वय २५, रा. आमराई रिसॉर्ट लॉजिंग, वेळू, मूळ रा. सरवडी, जि. लातूर) हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

 

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९३/२०२६ अन्वये अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल ठेंबे करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक स्नेहा गिरी आणि राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखालील राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रतिमा भांड, निलेश राणे, गणेश नांदे, इंगळे आणि भालेराव यांनी केली.


PUNYABHUMI NEWS

संपादक : मंगेश राजेंद्र पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *