ताज्या घडामोडी

पिक कर्ज देण्यास सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुखेड करतो टाळाटाळ__ मा तहसीलदारांना निवेदन


संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मो
7066166695
मुखेड तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुखेड बँकेला मुखेड तालुक्यातील व परिसरातील गावे दत्तक आहेत तरी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देतो म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यापासून फायली मागून घेऊन शेतकऱ्यांच्या फाईल वर सह्या करून घेऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुखेड या बँकेने पिक कर्ज देत नाही गेल्या तीन ते चार महिन्यापासून शेतकरी बँकेला फेर्‍या मारून वैतागला आहे बँक मॅनेजर साहेब यांना विचारपूस केली असता बँकेतील कर्मचारी बदलीवर गेलेले आहेत ते आता पीक कर्जाबाबत काही सांगू शकत नाही असे म्हणतात तरी मा तहसीलदार साहेबांनी बँका अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचा पिक कर्ज प्रश्न दिवाळी अगोदर मार्गी लावावे अशी शेतकरी निवेदनात म्हटले आहेत निवेदन करते शेतकरी दशरथ गणपती गायकवाड विठ्ठल निवृत्ती शिरसाठे गुरुनाथ रामचंद्र पेंढारकर आदींनी केले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: