ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांनी साधलेला जनतेशी संवाद म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास करणारा *- * आमदार सावरकर*


अकोला दि. ८ नोव्हेंर- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आजचा संवाद म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा फक्त भ्रमनिरास करणार होता. केवळ संवादातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परंतु या संवादाने जनतेला कुठलीही भरीव गोष्ट मिळाली नाही. आजही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्याचे काय.. तसेच एटीकेटी विद्यार्थी भविष्य काय सरकार यासंदर्भात काय करणार आहे. अतिवृष्टी व निसर्ग चक्रिवादळामुळे महाराष्ट्र उध्वस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची कोकणात विदर्भ मराठवाडा मिळाली नाही. महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न आहे. पण यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं नाही अशी टीकेची झोड अकोला जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज केली.
एसटी कर्मचारी रोज आंदोलन करत आहेत.चार महिने झाले तरीही त्यांचे पगार झालेले नाहीत. एसटी कर्मचारी रोज मरण यातना भोगतोय. या कामगारांची दिवाळी कशी गोड होणार, यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादातून दिले नाही उत्तर प्रदेश सरकारचा योजनेचा अभ्यास करून कामगारांना न्याय द्यावा. केवळ सामंजस्य करार करून चालणार नाहीत. त्या कराराची अंमलबजावणी जलद गतीने होताना दिसतं नाही. शहरातून ग्रामीण भागामध्ये जे चाकरमानी गेले, त्यांचं भविष्य काय? याचा विचारविनियम होताना दिसत नाही. तसेच अनेक विकास कामे थांबली याबाबत मुख्यमंत्री संवादात काहीही बोलले नाहीत असेही आमदार सावरकर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी केवळ भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिराचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणतात की, ज्या देवाच्या दयेने हे सर्व करतोय तोचं देव आज बंदिस्त आहे. त्याला मोकळे करण्याची आवश्यकता आहे परंतु त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच भाष्य केलं नाही. त्यामुळे त्यांचा संवाद हा केवळ ‘बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात’ आहे, असं म्हणावं लागेल असेही आमदार सावरकर यांनी सांगितले.
महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यामधील एका महिलेचे डोळे नराधमांनी फोडले आहे, त्यावर मुख्यमंत्र्याचे भाष्य नाही. राज्यातील सर्वांगिण परिस्थितीतवर भाष्य करण्याची आवश्यकता होती, पण सरकार म्हणून यावर काय उपाययोजना करणार आहोत यावर भाष्य नाही. विनाअनुदानित शिक्षक पगारापासून वंचित वंचित आहे सोयाबीनला भाव मिळत नाही, कोविडच्या डॉक्टरांनाही पगार मिळत नाही शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात एकही शब्द बोलत नाही िदर्भाच्या शेतकर्‍यांना झाला याविषयी सरकार एकही शब्द बोलत नाही बलुतेदार बारा अठरा पगड जाती बारा बलुतेदार जिव्हाळ्याच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलेले नाही. केवळ भावनिक वातावरण करित सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न व कोरोनाच्या बाबतीत पुन्हा केवळ फक्त बोलणे अश्या प्रकारे मुख्यमंत्र्याचां आजचा संवाद म्हणजे बोलाचीच कडी बोलाचाच भात अश्याच प्रकारचा होता असेही आमदार सावरकर यांनी नमुद केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: