ताज्या घडामोडी

मुखेड जांब व सावरगाव महसूल मंडळातील 12 गावांचा महसूल मंडळाच्या अतिवृष्टी यादीत समावेश करण्यात यावा मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची मागणी..

मुखेड तालुक्यातील जांब व सावरगाव महसूल मंडळातील 12 गावे अतिवृष्टी यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाहीत परंतु सदरील गावातील नागरिकांनी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात निवेदन देऊन सदरील गावे अतिवृष्टी यादीत समाविष्ट करण्यात यावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. जांब व सावरगाव मंडळातील सदरील बारा गावात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यात तूर मूग उडीद कापूस सोयाबीन अतिवृष्टी मुळे वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत जांब व सावरगाव मंडळातील सदरील गावांची नावेअतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज दिनांक 6, नोव्हेंबर 2020 रोजी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी माननीय ना. श्री दादाजी भुसे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे देण्यात आले आहे.

मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी पुण्यभूमी न्यूज नांदेड

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: