ताज्या घडामोडी

पद्मभुषण वसंतदादा पाटील माध्य.शाळा बिल्लाळी ता.मुखेड येथील सहशिक्षक श्री.वडजे जीवन तुकाराम सर सेवानिवृत्त….. —


——————————————
संग्राम पाटील तांदळीकर मो 7066166695
मुखेड तालुका प्रतिनिधी
पद्म.वसंतदादा पाटील माध्य.शाळा बिल्लाळी येथील सहशिक्षक श्री.वडजे जीवन तुकाराम यांनी आपली २७ वर्ष सेवा पुर्ण करुन दि.३१/१०/२०२० रोजी नियत वयोमानाने प्रदिर्घ सेवेतुन
सेवानिवृत्त झाले आहेत.
आपल्यातील सर्व कौशल्य जसेच्या तसे आपल्या विद्यार्थ्यात उतरवण्याचे काम एक हाडाचे शिक्षक म्हणून त्यांनी अत्यंत तळमळीने केले.
त्यामुळेच त्यांचे असंख्य शिष्य विविध क्षेञात व समाजउपयोगी कार्य करीत आहेत.असे कर्तबगार,कर्तव्यनिष्ठ,
कर्तत्ववान शिक्षक श्री.वडजे जे.टी.
यांच्या सेवानिवृत्तीचे औचीत्य साधुन कोरोना रोगाची दक्षता म्हणून हा छोटेखानी कार्यक्रम केवळ शाळा व स्टाफ पुरता मर्यादीत ठेऊन आज
दि.०५/११/२०२० रोजी कार्यगौरव तथा निरोप समारंभ आयोजीत करण्यात आला होता…
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक-
-.श्री.इंगळे व्हि.एम.साहेब,
———————————
सहशिक्षक–
श्री.पोटफोडे बी.एम, श्री.शिंदे यु.एम., श्री.चव्हाण व्हि.एम., श्री.जाधव ए.एम. श्री.पाटील व्हि, श्री.मादसवार जी.आर.
——————————
लिपीक- श्री.इंगळे बि.व्हि.
——————————
सेवक- श्री.पटेल बि. श्री.गायकवाड
—————————
तसेच आमच्या संस्थेतील कमला नेहरु मा.शा.नांदेड येथील सहशिक्षक व आमचे माझी सहकारी
श्री.इंगळे ए.पी.
संताबाई माध्य.शा.पाळा येथील
सहशिक्षक व आमचे माझी सहकारी

 • श्री.वाकडे एम.एम.,
  श्री.जाधव टि.एस,
  लिपीक- श्री.कदम पि.एल.
  सेवक- श्री.पांचाळ व्हि.डी.
  इत्यादी कर्मचा-यांच्या उपस्थितीत कार्यगौरव व निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.
  सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
  शाळेचे मु.अ.श्री.विठ्ठलराव मा.इंगळे साहेब होते.
  निरोप सत्कारमुर्ती श्री.वडजे जीवन तुकाराम यांचा यथोचित सत्कार व सर्व कर्मचा-यांनी आपल्या विचारातुन,मनोगतातुन कार्यगौरव करुन अश्रुपुर्ण नयनांनी निरोप देण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक
  श्री.इंगळे ए.पी. यांनी केले तर कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार श्री.मादसवार जी.आर. यांनी केले….
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: