ताज्या घडामोडी

जगण्याच्या धडपडीत तरुणाचं अपघाती निधन

  • जगण्याच्या धडपडीत तरुणाचं अपघाती निधन

तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथील तरुण पंजाब भीमराव दामोदर वय 32 वर्षे या तरुणाचं घोडेगाव तेल्हारा रस्त्यावर अपघाती निधन झाले.
सविस्तर वृत्त असे की पंजाबराव हा मजुरी करून आपल्या वृद्ध आई व पत्नी चे गुजराण करायचा कधी ट्रॅक्टर चालवणे तर कधी मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करायचा, निसर्गाची अवकृपा म्हणून की काय तेल्हारा तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीला लावलेला खर्च देखील निघाला नाही एवढे कमी उत्पन्न झाले. अशातच मजुराच्या हाताला देखील पाहिजे तसे काम मिळत नाही, सणासुदीच्या दिवसात कसे भागवायचे या विचारात पंजाबरावने आपला मोठा असलेल्या पुण्याला जायचे ठरवले व नेमका तिथेच घात झाला. दि. 4नोव्हेंबर ला पुण्याला जाण्याच्या तयारीत असताना घोडेगाव वरून तेल्हारा येथे जात असताना दुचाकी घसरून पंजाब व त्याचा मित्र दोघेही खाली पडले यात त्याला डोक्याला मार लागल्या मुळे तेल्हारा येथून अकोला येथे पाठविण्यात आले व अकोल्याहून नागपूरला पाठविण्यात आले परंतु मार डोक्याला लागलेला असल्यामुळे उपचाराला प्रतिसाद नं मिळाल्याने पंजाबची प्राणज्योत मालवली. एका वर्षाआधीच पंजाबराव चे वडिलांचे निधन झाले एक मोठा भाऊ पुण्याला असतो, अशातच कमावता पुरुष गेल्यामुळे त्याच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पंजाबरावचा स्वभाव मनमिळावू असून कोणाच्याही सुखदुःखात कधीही मदतीला जायचा
पंजाबराव चे अकाली जाणे घोडेगाव वाशियांच्याच्या मनाला चटका लावून गेले.

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
मो 962344993

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: