ताज्या घडामोडी

मंदिर खुले करण्यासंदर्भात सरकार गंभीर नाही आमदार शर्मा


दि. १ नोव्हेंबर- महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर या सरकारच्या भूमिका पूर्णपणे बदलले आहेत. पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारी लोक आता मंदिर उघडण्यापासून का दूर जात आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारनं नियमावली बनवून मंदिर उघडं अपेक्षित होते, परंतु दुर्देवाने सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही. मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. नियमावली बनवून मंदिर उघडण्यास काही हरकत नाही परंतु हे सरकार अहंकाराने भरलेला आहे. लोकांना काय वाटते यापेक्षा आम्हाला काय वाटतं तेच करू यावर सरकारचा भर असतो. सरकारने मंदिर उघडली नाहीत आणि राज्यभर मंदिर खोलो आंदोलन सुरू झालं तर भाजपा त्यांच्यासोबत उभी राहील असा इशारा आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला तसेच कार्तिक महिना सुरु झाला आहे या महिन्यामध्ये सकाळी काकड आरती म्हणणाऱ्या भक्तांवर हा अन्याय सरकार मंदिरामुळे covid-19 होतो हा शोध घेणाऱ्या चा सत्कार करण्याची गरज असल्याचेही सांगून वारकरी कीर्तनकार तसेच या परिसरात राहणारे दुकानदारांच्या तसेच मंदिराच्या अवलंबून राहणाऱ्या घटकांना पॅकेज देण्याची ऐवजी त्यांना उपास मारी करण्याचा आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याची दिशेने सरकारचे पावले जात असल्याचाही आरोप करून शिवसेना नेते राऊत यावर उत्तर का देत नाही असाही सवाल आमदार शर्मा यांनी केला आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: