ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न


= दी. ३१/१०/२०२० रोजी अकोट तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सभेचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांची उपस्थिती होती. सभेला सहकार शंकरराव चौधरी, कैलास गोंडचवर,जिल्हा उपाध्यक्ष परीमल लहाने, राजीव बोचे, सौ छायाताई कात्रे, सौ शारदाताई थोटे, सौ वृंदाताई मंगळे, सौ चारुलताताई थेटे, राम म्हैसने, सतीश हांडे, जमीर इक्बाल, रमेश हिंगणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात हरिदास दहिभात, कैलास थोटे, सुनिल खिरकर, यांच्यासह तालुक्यातील शेकडो युवक हजर होते.
सभेत तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच पक्षसंघटन मजबूत करून पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांची तयारी करण्या बाबत जिल्हा अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन राम म्हैसने, सय्यद शादाब शिवा गावंडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन नागेश आग्रे तर आभार प्रदर्शन अनिकेत कुलट यांनी केले.

शहर प्रतिनिधी अकोट.
देवानंद खिरकर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: