ताज्या घडामोडी

मोती अलंकार केंद्र” नूतनीकरण समारंभ संपन्न..श्री.नरसिंग महाराज नगरी अकोट येथे संत श्रेष्ठ श्री.गजानन महाराज तसेच गुरुवर्य संत वासुदेव महाराज,गुरुवर्य संत विदेही मोतीराम बाबा,श्री.संत सद्गुरू वसंत बाबा यांच्या कृपा प्रसादाने आजवर आपल्या सर्वांच्या प्रेमरूपी आशीर्वाद सहकार्याने गेली अनेक वर्षांपासून “मोती अलंकार केंद्र प्रतिष्ठान” प्रेम व स्नेह विश्वास संपादित करत यशस्वी वाटचाल करत आहे.दिनांक २८/ऑक्टोबर/२०२० रोजी मोती अलंकार केंद्राचा नूतनीकरण समारंभ श्री.नारायणराव रामकृष्ण अनासाने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.रमेशजी(नानासाहेब)हिंगणकर लाभले होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.नारायणराव इंगळे,डॉ.हर्षवर्धन मालोकर(स्त्री रोग तज्ञ),डॉ.सौ.मोनिका मालोकर(न्यूरॉलॉजिस्ट,अकोला)यांची लाभली होती.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.गणेशराव शेरेकर यांनी मोती अलंकार केंद्राची यशस्वी यशोगाथा मांडली.त्यामध्ये बोलतांना त्यांनी पाहता पाहता मोती अलंकार केंद्र प्रतिष्ठानाची दोन दशक यशस्वी सेवा पूर्ण झाली आहे या दोन दशकांच्या कालखंडाने मोती अलंकार केंद्राने सर्वांच्या मनात सुवर्ण आभूषणांच्या माध्यमातून एक अढळ स्थान निर्माण केले असल्याचे प्रतिपादन केले.यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रमेशजी (नानासाहेब) हिंगणकर यांनी मोती अलंकार केंद्राची विश्वासाची मालिका यापुढेही अविरत अशीच पुढे सुरू राहावी व सुवर्ण आभूषणांच्या नाविण्याला उभारी देत “मोती अलंकार केंद्र” हे प्रतिष्ठान नुतनीकरणातून आपल्याला सेवा देण्यासाठी नवीन रुपात येत असल्याने मनस्वी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास श्री.हरिभाऊ पांडे,श्री.डॉ.श्याम बोंद्रे,श्री.दिलीप बोचे,श्री.विजय धरमकर,श्री.मोतीमामा अग्रवाल,श्री.मिलिंद झाडे,श्री.डॉ.साहेबराव वालसिंगे,श्री.राजेशजी नागमते,श्री.मंगेशजी लोणकर,श्री.डॉ.नितीन लोखंडे,श्री.गजानन लोणकर,श्री.दिनेशजी भुतडा,श्री.भिकुभाऊ मालवे,श्री.बळीरामजी दाते,श्री.किसनराव मालवे,श्री.करतार सिंग गयधर,श्री.वासुदेवराव राहटे,श्री.महेंद्र वाघमारे,श्री.प्रल्हाद जालंदर,श्री.ईश्वरसिंग सूर्यवंशी,श्री.गजानन साबळे,श्री.दादाराव सोळंके,श्री.मनोज रघुवंशी,श्री.निखिल देशमुख,किशोर देशमुख,नीरज देशमुख,विंष्णू राऊत,निलेश वानखडे,कैलास वडाळे,मकरंद काटकर,शेखर माथने,विनोद माथने या मान्यवरांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी नूतनीकरण समारंभाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन गोपाल गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन हे मोती अलंकार केंद्राचे संचालक माधव अनासाने यांनी केले.कार्यक्रमात इतर हितचिंतकांसह संपूर्ण अनासाने परिवार उपस्थित होता.

शहर प्रतिनिधी अकोट
देवानंद खिरकर मो.नं.8888151905

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: