ताज्या घडामोडी

पॉवर ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सुरेंद्र बिसने यांचे आकस्मिक निधन.

पुण्यभुमी न्युज
पवन ठाकरे
शहर प्रतीनीधी
नांदगाव खंडेश्वर
८८८८४२३३२३
पत्रकारीता क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आणि मिलनसार व्यक्तिमत्व असलेले पावर ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष सुरेंद्र बिसने यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार आहे, एक मिलनसार व्यक्तिमत्व आणि सर्व पत्रकारांना एकत्र जोडण्याचा अहोरात्र प्रयत्न करणारे म्हणून सुरेंद्र बिसने हे संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भामध्ये सुद्धा कार्यरत होते. पावर ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक पत्रकारांना एकत्र आणण्याचे कार्य केले होते.

अमरावती शहराचे शहराध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होती, त्यांच्या जाण्यामुळे अमरावतीच्या वृत्तपत्रसृष्टीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ब्लड कॅन्सर होता आणि कॅन्सर सारख्या अतिसंवेदनशील अशा व्याधी सोबत ते लढत होते, आणि स्वतः हसत होते. त्यांच्या वरतीचं स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक भार सुद्धा होता. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखी खालावली होती, आणि त्यांना अहमदाबाद येथे उपचाराकरिता नेण्यात आले होते.

अहमदाबाद येथील उपचारानंतर काही दिवस त्यांनी पुनश्च आराम केल्यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली होती, त्यानंतर त्यांना परत नागपूर येथे जाण्यास डॉक्टरांनी सुचविले होते, त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील शासकीय रुग्णालयांमध्ये हे त्यांच्यावर ती शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती शस्त्रक्रिया सुद्धा योग्य रीतीने पार पडली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती पुन:श्च बरी झाली होती, मात्र अचानक 27 ऑक्टोबरच्या दिवशी त्यांना प्रकृतीमध्ये बिघाड जाणवला आणि त्यांना पुन्हा उपचाराकरिता सावंगी मेघे येथे हे नेण्यात आलं होतं, तेथेच त्यांची सायंकाळी सुमारे सात वाजताच्या दरम्यान प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय फक्त ५२ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने अमरावतीच्या वृत्तपत्रसृष्टीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. शिवाय घरातील कर्ता-करविता पुरुष निघून गेल्यामुळे बिसने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ – बहिणी आणि आई असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक कार्यकारी व जिल्हा कार्यकारीने आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. ईश्वर सुरेंद्र बिसने यांच्या आत्म्यास चीर शांती प्रदान करो अशा भावना पॉवर ऑफ मीडियाच्या कार्यकारिणीने व्यक्त केल्या गेल्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: