ताज्या घडामोडी

विभागीय आयुक्त येथे आषाढी वारी संदर्भात विदर्भातील दिंडी प्रमुखांची प्रशासकीय बैठक घेन्यात यावी

विदर्भा मधून आषाढी वारीला किमान चाळीस दिंड्या जातात पण त्या पालखी सोहळ्यात कुठल्याही प्रकारची सरकारची मदत मिळत नसून विदर्भातील पालखी सोहळा कडे सरकारची व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आणि म्हणून सरकारने या गंभीर विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अमरावती – महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर आहे व आषाढी वारी हा वारकऱ्यांचा प्राण वारी आहे पण मागील वर्षी आषाढी वारी मध्ये फक्त मानाच्या नऊ पालख्यांना परवानगी मिळाली होती पण विदर्भामध्ये किमान 40 पालख्या अशा आहेत की त्यांची शेकडो वर्षाची पायदळ वारीची परंपरा आहे याहीवर्षी कोरोना चे संकट आहेच हे आम्हालाही मान्य आहे आणि म्हणून आमचा आग्रह पायदळ वारी करीता अजिबात नाही पण आमची वारी खंडित होऊ नये याकरिता प्रत्येक पालखी सोहळा सोबत किमान दहा वारकऱ्यांना वाहनाने वारी करण्याची परवानगी द्यावी त्यामध्ये वारीला जाणारे वारकरी समोरील नियम पाडतील , कोरोनाचा आपणास निगेटिव्ह अहवाल देण्यात येईल , ज्या वाहनाने जायचे ते वाहन सेनीटाईज केल्या जाईल , पंढरपूरला जात असताना कुणाच्याही संपर्कात वारकरी येणार नाहीत , पंढरपुरामध्ये आमच्याच मठामध्ये आम्ही राहणार आहोत , चंद्रभागेचे स्नान नगरप्रदक्षिणा करतेवेळी पंढरपुर क्षेत्रामध्ये लोगो लावण्यात यावा जेणेकरून कुणाचा संपर्क एणार नाही ,ज्यांच्याजवळ गाडीची पास फक्त त्यांनाच दर्शनाची सुविधा असायला पाहिजे , पंढरपूर मध्ये फक्त एकच दिवस वास्तव्य करायचे आहे पौर्णिमेपर्यंत मुक्काम पाहिजे असा अजिबात आग्रह नाही , पंढरपूर मध्ये दशमी एकादशी च्या दिवसाला मानाच्या पालख्या राहतील म्हणून त्या दिवसाच्या करीता आमचा अजिबात आग्रह नाही षष्टी पासून तर नवमीपर्यंत कोणताही एक दिवस चालेल
आम्ही वर दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणार आहोत या व्यतिरिक्त आपण जे काही नियम द्यावे ते सर्व नियम काटेकोरपणे पालन केल्या जातील अशी आम्ही काही देतो पण आमचे विचार सरकारपर्यंत पोहचविण्याकरीता एक विभागीय आयुक्त मध्ये पालखी सोहळा समिती व विदर्भातील दिंडी चालक यांची प्रशासकीय मीटिंग घालून द्यावी ही आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे आपण जो दिवस आणि वेळ द्याल तो आम्हाला मान्य राहील त्या दिवसाला आम्ही सर्व दिंडी चालत आपल्या इथे चर्चा करण्याकरिता बोलावणार आहोत तरी आमच्या मागणीचा आपण गांभीर्याने विचार करून चर्चेकरिता तारीख द्यावी ही नम्र विनंती अशा आशयाचे निवेदन विश्व वारकरी सेनेच्या वतीने आज पोलीस विभागीय आयुक्त अमरावती येथे देण्यात आलेले आहे.
निवेदन देतेवेळी ह भ प हरिओम महाराज शास्त्री वि वा से मार्गदर्शक, सोपान महाराज विश्व वारकरी सेना अमरावती जिल्हा अध्यक्ष, हभप विठ्ठल महाराज चौधरी विश्व वारकरी सेना अमरावती जिल्हा सह अध्यक्ष, कार्तिक महाराज इंगोले, श्रीकांत महाराज चौधरी ,बबनराव चव्हाण सर आदी संत मंडळी उपस्थित होती.

 
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: