ताज्या घडामोडी

रा. काँँ.पार्टी सा.न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी लक्ष्मण सुरनर यांची निवड..

रा. काँँ.पार्टी सा.न्याय विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी लक्ष्मण सुरनर यांची निवड..
देगलूर तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी मुखेड तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सुरनर यांची निवड करण्यात आली आहे.

फुले,शाहू,शिवाजी महाराज,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर पद्मविभूषण आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाची ध्येय – धोरणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे मा.जयदेव अण्णा गायकवाड यांच्या आदेशाने मा. पंडितराव कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष कपिल कांबळे जुन्नेकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली आहे.अशी माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष कपिल कांबळे जुन्नेकर यांनी दिली आहे. यावेळी अण्णासाहेब जाहिरे, राजू शिंदे जुन्नेकर, शिवाजी कबनुरकर, नितीन वाघमारे गोजेगावकर यांच्या सह अदी जण उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: