ताज्या घडामोडी

उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथेनवतरुण शिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथेनवतरुण शिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न..
मनोज बिरादार देगलूर तालुका प्रतिनिधी
आज उंद्री (प.दे.) ता. मुखेड शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम श्री सुधाकर गनलेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्री माधवराव तुकाराम पाटील वडजे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन श्री संदीप सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. रयतेचे राजे, कुलवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नवतरुण शिवराजे मित्र मंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2021 उंद्री प.दे .येथे covid-19 कोरोना प्रादुर्भाव निमित्त अतिशय साधा व कमीत कमी शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला . शासनाच्या आदेशाचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बारा बलुतेदार, आणि अठरा पगड जातींना आपल्या स्वराज्यात स्थान देऊन खर्‍या अर्थाने जाती निरपेक्ष धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था निर्माण करणारे निधर्मी राजेगुलामगिरी करू शकत नाही असे स्वराज्यनिर्माते अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर साऱ्या विश्वाचे आराध्यदैवत रयतेचे राजे परस्त्रीला मातेसमान मानणारे राजाधिराज, क्षत्रियकुलावंत, प्रजाहित दक्ष, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, कुळवाडीभूषण,महाराजांच्या जयंती निमित्त मानाचा त्रिवार मुजरा .. जय जिजाऊ जय शिवराय यावेळी सुधाकर गनलेवार, माधवराव तुकाराम पाटील वडजे,गोपाळ पाटील बिरादार, योगेश वडजे,अनिल पाटील वडजे, श्रीराम पाटील सूर्यवंशी. श्रीराम पाटील वडजे ,राजू पाटील सूर्यवंशी, माधव पाटील पसारे, उमेश सोनकांबळे, आकाश पाटील वडजे, पत्रकार मनोज पाटील बिरादार, पत्रकार बालाजी पाटील शिंदे,मारोती पाटील वडजे, यशवंत वडजे,मुकिंदा सोनकांबळे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व नवतरुण शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: