ताज्या घडामोडी

मुखेड येथील आडत व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड यांना देण्यात आले निवेदन…

मुखेड येथील आडत व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड यांना देण्यात आले निवेदन…
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड येथील आडत व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड येथील सभापती साहेबांना निवेदन देण्यात आले. मुखेड येथील आडत व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याने मुखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील आडत व्यापारी हे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत असून शेतकऱ्यांचे चार किलो कट्टी अवैधरित्या घेत आहेत. तसेच दोन टक्के पैसे कापून घेत आहेत. शेतकऱ्यांचे माल खरेदी करून त्यांना तात्काळ मोबदला न देता जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत.तरी संबंधित मुखेड यार्डातील अडत व्यापाऱ्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड मुखेडच्या वतीने रुमणे मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्याचे होणारे परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: