ताज्या घडामोडी

बोर्डी ग्राम पंचायत पेंटींग दंड प्रकरणी गैरअर्जदार यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा आदेश… तहसीलदार अकोट यांनी दिले सबंधीत तलाठी यांना बोजा चढवण्या बाबत पत्र…

बोर्डी ग्राम पंचायत पेंटींग दंड प्रकरणी गैरअर्जदार यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा आदेश…
तहसीलदार अकोट यांनी दिले सबंधीत तलाठी यांना बोजा चढवण्या बाबत पत्र…
देवानंद खिरकर = अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी यांनी सन 2010 ते सन 2015 या कालावधीत बोर्डी गावात रस्ता,नाली बांधकाम,व ईतर विकास कामे केली होती.सदर बांधकामा करीता अवैध गौणखनिज,चोरीची रेती वापरली या बाबत बोर्डी मधुन जिल्हाधिकारी,जिल्हाखनिकर्म अधिकारी,पालकमंत्रि,अकोला यांचेकडे लेखी तक्रार करण्यात आली होती.त्या तक्रारची दखल पालकमंत्रि यांनी घेतली व उपविभागीय अधिकारी अकोट यांना चौकशी करून कारवाई करावी असे आदेश दिले होते.या आदेशा वरुन मा.उपविभागीय अधिकारी अकोट यांनी बोर्डी ग्राम पंचायत रेकार्ड ची तपासणी केली होती.व लाडेगावची नदी,घोगानाला मधुन 50 ते 60 ब्रास रेती चोरी गेल्याचे आढळले असा अहवाल मंडळ अधिकारी व तलाठी बोर्डी यांनी पाहणी करुन पंचनामा केला होता नंतर गैरअर्जदार 1 ते 5 यांना उपविभागीय अधिकारी अकोट यांनी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.सतत 7 महिने सुनावणी घेण्यात आली.अखेर सर्वांचे लेखी बयाण घेवून प्रकरण आदेशा करीता बंद केले होते.दि.1/3/2016 रोजी गैरअर्जदार 1 ते 5 यांच्या विरुध्द दंडाचा आदेश पारित केला होता.व दंड भरणे बाबत नोटीसा बजावल्या होत्या वारंवार नोटीसा बजावुन सुध्दा गेल्या तिन वर्षा पासुन गैरअर्जदार यांनी दणदण भरल्यामुळे गैरअर्जदार 1 ते 5 यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्या बाबत सबंधीत तलाठी यांना लेखी पत्र दिले आहे व तात्काळ बोजा चढवुन सातबारा सह अहवाल सादर करा असे लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
तक्रारदार प्रतिक्रीया
ग्राम पंचायत बोर्डी यांनी गावात केलेल्या विकास कामा बाबत व वापरलेल्या अवैध गौण खनिज,चोरीची रेती बाबत मी लेखी तक्रार दिली होती.त्याची चौकशी करून सबंधीतांना उपविभागीय अधिकारी अकोट यांनी दंड केला आहे.तो दंड भरला नसल्यामुळे मी सतत पाठपुरावा केला होता.अखेर गैरअर्जदार 1 ते 5 यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा तहसीलदार अकोट यांनी तलाठ्यांना आदेश दिला आहे.
देवानंद रमेश खिरकर बोर्डी.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: