ताज्या घडामोडी

आकोट भाजपा महिला आघाडी ची आढावा बैठक संपन्न…

आकोट भाजपा महिला आघाडी ची आढावा बैठक संपन्न…
बाळासाहेब नेरकर कडुन
स्थानीक माहेश्वरी भवन आकोट येथे दि 11 फेब्रुवारी रोजी आकोट शहर व ग्रामीण ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश महामंत्री सौ अश्विनीताई जिचकार,प्रदेश उपाध्यक्ष सौ नयनाताई मनतकार,प्रदेश सचीव सौ सुरेखाताई लुंगारे, प्रदेश सदस्य सौ भारतीताई पुंडकर,तेल्हारा नगराध्यक्ष जयश्रीताई पुंडकर,महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ कुसुमताई भगत, जी प सदस्य कोमलताई पेठे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ सिंधुताई गडम हया व्यासपीठावर विराजमान होत्या. सर्वप्रथम महीला पदाधिकारी यांनी भारतमाता,शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय यांच्या फोटोचे पूजन केले.आकोट भाजपा च्या वतीने महिला पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सौ लुंगारे, सौ मनतकार, यांनी मार्गदर्शन केले.प्रदेश महामंत्री सौ अश्विनीताई जिचकार यांनी आढावा घेऊन मार्गदर्शन करतांना भाजपा मध्ये मातृशक्ती चे कार्य महत्त्वाचे आहे. नारीशक्ती पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर राहून समाजसेवा करीत आहे.पक्षकार्यासाठी अधिक वेळ देऊन बुथस्तरा वर कार्य करावे असे सांगितले.प्रास्तविक कुसुमताई भगत यांनी केले.संचालन मायाताई जावरकर यांनी तर आभार कु मेघा मोहोड यांनी मानले.याच वेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या बैठकी ला रुपालीताई काकडे,ऍड राधिकाताई देशपांडे,कु चंचल पितांबरवाले,शुभांगीताई टेमझरे, माधुरीताई बोडे,नगरसेविका लताताई साबळे,नगरसेविका शशिकलाताई गोयगोले, नगरसेविका कल्पनाताई घावट, नगरसेविका मायाताई धुळे,नगरसेविका जेसवाणी,आशाताई शेंडे,दीपालीताई तिडके,मालतीताई टिकले,स्वातीताई गंभीरे, प्रतिभाताई येउल,मीनलताई पिंगळे,आशाताई शेंडे,चंदाताई घुगरे सौ गायकवाड, उज्वलाताई येउल,कु रेळे यांचेसह भाजपा आकोट शहर अध्यक्ष कनकभाई कोटक,भाजपा तालुका अध्यक्ष प्रा अशोकराव गावंडे राजेश नागमते, राजेश रावणकर,गोपाल पेठे,योगेश नाठे,अनिरुध्द देशपांडे, मयूर महल्ले,प्रकाशपाटील गडम,यांचेसह भाजपा पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: