ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान मंदिराच्या परिसरात शांभवी अजानवृक्षाचे वृक्षारोपण..

श्रीक्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान मंदिराच्या परिसरात शांभवी अजानवृक्षाचे वृक्षारोपण..
मनोज बिरादार देगलूर तालुका प्रतिनिधी.
श्री क्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान डावजे डोनजे मंदिर जे संपूर्ण देशभरात शिवभक्तितून व्यसनमुक्तीसाठी प्रसिद्ध आहे त्या परिसरात पुत्रदा एकादशी चे औचित्य साधून शिवलिंगाची विधिवत पूजा अर्चा करून शांभवी अजानवृक्षाचे वृक्षारोपण मंदिर परिसरात करण्यात आले.श्रीक्षेत्र स्वयंभू निळकंठेश्वर देवस्थान ,बायोसिफअर्स व मावळा जवान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अजानवृक्षाचे रोपटे आळंदी येथील सिद्ध भेट या पुरातन शिव पिठातील,(ज्ञानदेवांची जन्मभूमी लिला भूमी कर्मभूमी) मूळ अजान वृक्षापासून तयार करण्यात आले आहे. जनु त्याचीच प्रतिकृती आहे.या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प.पू.शि.श्री शिवदास (भाऊ) शंकरराव सर्जे , बायोसिफअर्स चे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सचिन पुणेकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्ताभाऊ नलावडे नांदेड सिटी चे संस्थापक संचालक ऍड.नरसिंह लगड बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या संस्थापक अधिक कदम, कृष्णा कुमार गुप्ता आर्किटेक्ट आदित्य पाटील ,नागपूरचे समाज सेवक सुमित कामाडी,आयटी क्षेत्रातील चेतन एरंडे शाहू सावंत मंदिर समितीचे सदस्य व भाविक मोठ्या संख्येने या वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित होते. अजाण वृक्षाप्रमाने औषधी, व दुर्मिळ पण महत्वाच्या वनस्पती आपल्या भागात असतात तर आपणही देवस्थानच्या आवारात “एक झाड माझ” या उपक्रमात भाग घेऊन एक वृक्ष देवस्थानला भेट देऊ शकता असे आवाहन ही मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांना करण्यात आले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: