ताज्या घडामोडी

मुखेड तालुक्यातील चांडोळा जिल्हा परिषद गटातील गट ब अंतर्गत चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विविध कामांचे भूमिपूजन..

मुखेड तालुक्यातील चांडोळा जिल्हा परिषद गटातील गट ब अंतर्गत चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विविध कामांचे भूमिपूजन..
मनोज बिरादार देगलूर तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील चांडोळा जिल्हा परिषद गटातील गट-ब अंतर्गत चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विविध कामाचे उद्घाटन महिला बालकल्याण सभापती सौ.सुशीलाताई हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या चांडोळा जिल्हा परिषद मतदार संघातील नंदगाव सलगरा चांडोळा रस्त्यासाठी 70 लाख रुपये व नंदगाव डोंगरगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 70 लाख रुपये बेटमोगरा ते शिवलिंग बादशहा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 70 लाख रुपये व जूनी माऊली ते नवीन माऊली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये व तसेच डोंगरगाव ते बावलगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये मंडलापुर हिब्बट मोटरगा खतगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये व तसेच जुने बावलगाव ते नवीन बावलगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये अशा विविध कामांसाठी एकूण चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सौ. सुशीलाताई हनमंतराव पा. बेटमोगरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी असंख्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: