ताज्या घडामोडी

वडाळी देशमूख येथे ग्रामपंचायत सरपंच पदी प्रवीण शिंगाळे तर उपसरपंचपदी सौ. कल्पना गणेश बोडखे यांची निवड

वडाळी देशमूख येथे ग्रामपंचायत सरपंच पदी प्रवीण शिंगाळे तर उपसरपंचपदी सौ. कल्पना गणेश बोडखे यांची निवड
*
वडाळी देशमुख

     अकोट तालुक्यामधील बहुचर्चित असलेली ग्रामपंचायत ही 9 जागेसाठी असलेली ग्रामपंचायत निवडणूक ही आरक्षण सोडत सर्वसाधारण पुरुष ही या जागेची नेमणूक करण्यात आली होती,

मंगळवार दिनांक 9 तारखेला ग्रामपंचायत भवनामध्ये दुपारला होऊ घातलेली निवडणूक प्रक्रिया ये ला प्रारंभ होता, सरपंच पद व उपसरपंच पद या पदाची निवड नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्वानुमते निवडणूक प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात यावे अशी जोराची मागणी होती तरी त्यांची मागणी अध्यक्षीय निवडणूक अधिकारी यांनी त्यांची मागणी ग्राह्य धरून गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात सुरुवात करण्यात आली निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम हजर असलेल्या सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचपदी सौ. निताताई केशव बिलेबिले यांचा अर्ज दाखल केला असता यांना 5 मते मिळाली तर प्रवीण पंजाब शिंगाळे यांनी अर्ज दाखल केला असता त्यांना 6 मते मिळाली त्यावेळी त्यांना विजयी घोषित करून त्यांना सरपंचपदी निवड करण्यात आली,
उपसरपंच पदासाठी सौ. कौशल्याबाई ज्ञानेश्वर खोबरखेडे यांचा अर्ज दाखल केली असता यांना 5 मते मिळाली, व सौ. कल्पना गणेश बोडखे यांनी अर्ज दाखल केला असता यांना 6 मते मिळाली त्यावेळी त्यांना विजय घोषित करून उपसरपंचपदी त्यांची निवड करण्यात आली, यावेळी ग्रामपंचायत सभागृहात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संजय शेषराव खलोकार, सौ. नीताताई केशव बिलबिले, सौ. कौशल्याबाई ज्ञानेश्वर खोबरखेडे, सौ .अश्विनी रोशन टोहरे, भगवान देविदास चौधरी, व सौ. मंगला धनु वाहुरवाघ, सौ. पुनम देवानंद जुनगरे, पांडुरंग नारायण रेवसकार, जगत गणेश वाहुरवाघ ,यावेळी निवडणूक प्रक्रिया अध्यासीय अधिकारी सी .पी .एम बनसोड, तर वडाळी ग्रामपंचायत ग्रामसेवक विजय नवलकार, पटवारी नरेश रतन, ग्रामपंचायत कर्मचारी नंदकिशोर हाडोळे, मंगेश मोहकार, रोजगार सेवक सोपान डवाले, ग्रामपंचायत कर्मचारी सर्व हजेरी लावून सु व्यवस्थेने हजर होते,वडाळी देशमुख ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर सांगळे पोलिस कर्मचाऱ्यांचा चोक बंदोबस्त लावण्यात आला होता, यावेळी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली असता सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस साठी शुभेच्छा दिल्या , सर्वांची त्यांनी आभार मानले,
अकोट प्रतिनिधी पवन बेलसरे,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: