ताज्या घडामोडी

दहिगाव येथे चोवीस तास थ्री फेज द्या अन्यथा आंदोलन! भाजयुमोचे कार्यकारी अभियंतांना निवेदन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे विजेच्या लपंडावाने नागरीक त्रस्त झाले असून अन्य गावांप्रमाणे गावात चोवीस तास थ्री फेज लाईट द्या अन्यथा महावितरणच्या तेल्हारा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आज भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी निवेदन देवून दिला आहे.
तालुक्यातील मौजे दहिगाव येथे मानात्री उपविभागातून वांगेश्वर फिटर वरून विद्युत पुरवठा होतो.जंगलातून आडमार्गाने येणाऱ्या या विद्युत वाहिनीवर अतिरिक्त कनेक्शन जास्त भर असल्यामुळे दिवसातून अनेकदा लाईट जाते.कधी कमी जास्त होलटेज होत असल्याने गावातील अनेकांचे इलेक्ट्रॉनिक यंत्र सुद्धा जळण्याचे अनेक प्रकार याआधी गावात झाले आहेत.त्यामुळे दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या दहिगावला स्वतंत्र फिटर देवून चोवीस तास थ्री फेज लाईट उपलब्ध होईल अशी कार्यवाही पंधरा दिवसांच्या आत करावी अन्यथा भाजयुमोच्या वतीने कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आजच्या निवेदनात दिला आहे.यावेळी दिलेल्या निवेदनावर उत्तमभाऊ काकड,ज्ञानदेवराव घंगाळ,योगेश अवताडे,अमोल तळोकार, प्रकाश अवताडे,शशिकांत बोरसे, विठ्ठल काळदाते,उकर्डाभाऊ गोमासे,संजय धरमकर,पांडुरंग झापर्डे,संदीप दांदळे,मनोज शर्मा,दादाराव गवळी, पंकज पांडे,उपसरपंच स्वप्नील भारसाकळे, गजानन डोंगरे,संजय अवताडे,भास्करराव डोंगरे,विवेक अवताडे,सागर खराटे,दीपक डोंगरे,श्रीकृष्ण शेळके,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: