ताज्या घडामोडी

खिरकुंड बस सुरू करा पणज ग्रामस्थांची मागणी

खिरकुंड बस सुरू करा पणज ग्रामस्थांची मागणी

पणज आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील विद्यार्थी आकोट येथे शिक्षणासाठी मोठ्या संख्येने जातात गेल्या काही महीन्यात सर्वत्र कोरोनाचे संकट उभे झाले होते या कोरोनाची साकळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाने आणी शासन दरबारी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या असून गेल्या 27 जानेवारी 2021 पासुन सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत परंतु पणज बस स्टँपवर जलद गतीने धावनारी किंवा अडनरी बस थांबत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे त्याच बरोबर गेल्या अनेक महिन्या पासुन खिरकुंड बस बंद असल्याने पणज व रुईखेड येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर हेलपाटे सहन करावे लागत आहेत
आता शाळा सुरू झाल्या आहेत परंतु सकाळी शाळेत जाण्याकरिता सकाळची बस नसल्याने विद्यार्थ्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता उशीर होऊन विद्यार्थ्यांचे वेळेवर बस येत नाही किंवा बस थांबा असुन सुद्धा बस थांबत नसल्याने यावेळी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकासन होत आहे त्या करिता सकाळची वडाळी बस हे पणज बसस्थानकावरून नेण्यात यावी व खिरकुडं बस सुरू करावी तसेच परतवाडा डेपोच्या अनेक बस पणज बस स्टाँपवर थांबत नसून विध्यार्थंचे नुकसान होत आहे खिरकुंड बस सुरू करावी जलद गतीने धावणाऱ्या बस थांबावे वडाळी देशमुख येथे जाणारी बस पणज बस स्टाँपवरुन जावे अशा अनेक मागणीचे लेखी निवेदन आकोट आगार प्रमुखांना देण्यात आले यावेळी पणज ग्राम पंचायत चे माजी सरपंच प्रदीप ठाकूर नवनिर्वाचित सदस्य मधुकरराव कोल्हे गजानन अकोटकर संजयराव देशमुख ओमप्रकाश शेंडे दिनेश बोचे पत्रकार अनिल रोकडे रोशन राऊत चेतन बोचे संजय गवळी पत्रकार नईम पटेल विद्यार्थी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: