ताज्या घडामोडी

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव भव्य याञा महोत्सव रद्द

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव भव्य याञा महोत्सव रद्द
परंतु सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबविनार
श्री गजानन महाराजांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या याञा महोत्सवामध्ये खंड पडू नये म्हणून श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव च्या विश्वस्त मंडळ तसेच मोजक्या सेवाधारींच्या उपस्थितीत दि २१/१/२०२१ ला याञा सप्ताह प्रारंभ करीत आहे. तसेच दैनंदिन कार्यक्रम रोज सकाळी ५ ते ६ काकडा सायं ६ ते ७ हरिपाठ.
गुरुवार दि. २१/१/२०२१ दुपारी १ वाजता भक्त निवासाचे भूमिपूजन, श्री झामसिंग महाराज संकुल मध्ये आहे. तसेच डॉ. निखील धांडे हृदय रोग तज्ञ, मधुमेह रोग तज्ञ, MBBS, MD, MEDICINE अकोट यांच्ये तपासणी शिबीर दुपारी २ ते ५ पर्यंत आहे.
रविवार दि. २४/१/२०२१ डॉ. पार्थ रा. गवात्रे अस्थी रोग तज्ञ MBBS, MSD ORTHO आणि प्रिया चिमा. गवात्रे स्त्री रोग तज्ञ MBBS, DGO, DNB अकोला यांच्ये आरोग्य शिबीर सकाळी ११ ते ४ पर्यंत राहणार आहे. सोमवार दि. २५/१/२०२१ रोजी जवान शिवाभाऊ भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवा भालेराव मित्र परिवारा तर्फे भव्य रक्तदान शिबिर वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत स्थळ सोपिनाथ महाराज संस्थान मुंडगाव येथे तर
श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावच्या यात्रेची सुरवात दि 21 जानेवारी 2021 गुरुवार पासून होणार आहे. त्याच दिवशी निबंध स्पर्धा शुभारंभ होणार आहे. निबंध स्पर्धा मधील विषय~ संत नगरी मुंडगावची पौराणिक कथा, इतिहास, संतांचे चरित्र, व्यक्ती विशेष, महत्वपूर्ण घटना, गावाची वैशिषतः मुंडगावच्या सर्व जाती धर्माच्या चालीरीती,रूढी,परंपरा,संस्कृति.यावर निबंध स्पर्धा आहे तसेच
गुरुवार दि 28/1/2021 पौष पोर्णिमेला सप्ताहाची सांगता होणार आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे यात्रेतील महाप्रसाद, दिंडी मिरवणूक व दहीहांडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळ, सल्लागार समिती व गावकरी मंडळीने घेतला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: