ताज्या घडामोडी

डेंगू प्रतिबंधक उपाययोजना तेल्हारा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत भाजयुमो चे निवेदन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात डेंगू या आजाराचा प्रभाव मागील काही दिवसांपासून वाढलेला दिसत आहे .परंतु,अजून पर्यंत प्रशासनाकडून कुठलीच ठोस उपाययोजना राबिण्यात आल्याचे चित्र तेल्हारा तालुक्यात दिसत नाही आहे.आधीच कोरोना सारख्या महामारीच्या विळख्यात संपूर्ण देश आला आहे आणि त्यात डेंगू सारखा आजाराचा संसर्ग वाढल्यास मानवी जीवनावर त्याचे अनुचित परिणाम होणार आहेत.
त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा चे वतीने भाजप जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व भाजयुमो जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांचे नेतृत्वात तेल्हारा तहसील येथे निवेदन देण्यात आले.या निवेदनाची दखल घेऊन प्रभावीपणे उपययोजना न राबविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराच भाजयुमो कडून देण्यात आला आहे.या निवेदनावर भाजयुमो जिल्हा सचिव सुमीतआप्पा गंभिरे,जिल्हा सचिव विशाल कोकाटे,सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार ,विजय बोर्डे,सुनील आमले, धीरज नेमाडे,अनिकेत नेमाडे ,योगेश नेमाडे,केशव नेमाडे,सोमेश नेमाडे,शिवा खाडे यांच्या स्वाक्षरी असून निवेदनावेळी असंख्य भाजयुमो पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: