ताज्या घडामोडी

पत्रकार दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्या कडून पत्रकारांचा सन्मान

अकोट शहर प्रतिनिधी
स्थानिक अकोट शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल हिंमत दौलत दंदी (ब.नं-१५४०) यांनी पत्रकार दिनानिमित्त शहर तसेच ग्रामीण भागातील पत्रकार, चॅनल, छायाचित्रकार यांना पेन ,डायरी व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनानिमित्त सत्कार केला.हिंमत दंदी यांना कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना अनेक सामाजिक संघटनांनी त्यांना “कोविड योद्धा”पुरस्काराने सन्मानित केले आहे.सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल हिंम्मत दंदी हे अकोट शहरात सुपरिचित आहे.आज त्यांनी प्रत्येक वृत्तपत्रांच्या कार्यालयात प्रतिनिधींना भेट देऊन त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या,या बद्दल बोलताना दंदी म्हणाले की पोलीस आणि पत्रकारांचा कार्यपद्धतीत मोठे साम्य आहे.दोघांच्याही कामाच्या वेळा निश्चित नसतात, समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शासनाच्या विविध कार्यालयांच्या कामकाजाचे योग्य मूल्यमापन पत्रकारांकडून केले जाते, पत्रकार अनेकदा उजळत न येता पडद्यामागून आपले काम करतात अनेक पत्रकार निर्भीड असतात अन्याय होत. असलेल्या ठिकाणी न्याय मिळवून देतात त्यांना वंचित उपेक्षित समाजाचे दुःख समोर आणून सकारात्मक दृष्टी ठेवतात, त्यामुळे अशा सत्काराने त्यांना प्रेरणा मिळणार असल्याचे पो. हे. कॉ हिम्मत दंदी म्हणाले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: