ताज्या घडामोडी

कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य दिशादर्शक – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य दिशादर्शक – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
जिल्हा पत्रकार संघाचा पत्रकार दिन थाटात संपन्न
प्रतिनिधी, ६ जानेवारी
अकोला – कोरोनाचा सुरूवातीचा कालखंड प्रचंड दहशतीचा होता. नेमके  कार्य कोणते व कसे करावे हे प्रशासनाला व समाजाला देखील अवगत नव्हते. त्या कालखंडात पत्रकारांनी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाला केलेले सहकार्य दिशादर्शक ठरले, असे प्रतिपादन अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंंद्र पापळकर यांनी केले. ते स्थानिक पत्रकार भवनातील स्व. पन्नालाल शर्मा सांस्कृतिक सभागृहात आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर व्यासपिठावर विराजमान होते. कोरोना कालखंडात राज्यातील ५४ पत्रकारांचा कोरोना संक्रमनामुळे मृत्यू झाला अशा सर्व ज्ञात अज्ञात दिवंगत पत्रकारांना कार्यक्रमात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर व अतिथिंच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमात विशेष अतिथि म्हणून बोलतांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोना कालखंडाचा धावता आढावा सादर केला. कोरोना कालखंडात पत्रकारांच्या बातम्या ह्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी होत्या. पत्रकारांनी कोरोना दहशतीच्या कालखंडातही जीवावर उदार होवून वार्तांकन केले. हे पत्रकारांचे कार्य अभिमानास्पद होते. समाजातील स्वयंमसेवी सुध्दा दुसNया बाजुला समाजाची मदत करत होते. पत्रकार व समाज सेवकांचे हे उल्लेखनीय कार्य शब्दात मांडणे कठीण असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. कार्यक्रमात बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कोरोना योध्दा पत्रकारांचा व कोरोना योध्दा स्वयंमसेवकांचे कौतुक केले. प्रशासन म्हणून आम्ही सुरूवातीला प्रचंड दहशतीत होतो. त्या काळात प्रशासनाची ताकद वाढविण्याचे कार्य पत्रकारांनी केले असे प्रा. खडसे म्हणाले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सिध्दार्थ शर्मा यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शौकतअली मिरसाहेब यांनी केले. दरम्यान याच कार्यक्रमात प्रमुख वक्त्त्यांच्या व्याख्यानानंतर कोरोना योध्दा पत्रकार प्रविण खेते, माणिक कांबळे, साकिब अकुद्रुस, अनिल दंदी, रविंद्र इंगळे, किरण निमकंडे, जयप्रकाश रावत, अनंत अहेरकर, राजेंद्र श्रीवास, निलेश धाडीकर या पत्रकारांचा तसेच कोरोना योध्दा स्वयंमसेवक म्हणून प्रा. किशोर बुटोले, गिरीश जोशी, जावेद जकेरिया, प्रकाश घोगलिया, सौ. अलका देशमुख, डॉ. जुबेर नदीम, प्रकाश लोडीया, पराग गवई, निशीकांत बडगे, रामदास सरोदे यांचा त्यांच्या सहकाNयांसमवेत सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून जिल्हाधिकाNयांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या शानदार कार्यक्रमाचे दोन सत्रात नियोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाचे संचलन प्रमोद लाजुरकर यांनी तर दुसNया सत्रातील सत्कार सोहळ्याचे संचलन संजय खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उमेश अलोने यांनी केले.
कार्यक्रमाला राजु उखळ्कर, गजानन सोमाणी, रामदास वानखडे,  विजय शिंदे, कितीaकुमार वर्मा, प्रा. अविनाश बेलाडकर, अविनाश राउत, कमलकिशोर शर्मा, उमेश जामोदे, सुरेश नागापुरे, दिलीप गिNहे, बी.एस. इंगळे, विलास खंडारे, समाधान खरात, मधु कसबे, मनिष खडसे, प्रा. मधु जाधव, प्रा. मोहन खडसे, दिपक देशपांडे, मुुकुंद देशमुख, सुधाकर देशमुख, विजय सारभुुकन, उमेश देशमुख, प्रदिप काळपांडे, संगिता इंगळे, वंदना शिंगणे, निलिमा शिंगणे, प्रल्हाद ढोकणे, सुरेश सिंगनारे, सदानंद खारोडे, शैलेश अलोने, प्रा. प्रविण ढोणे, मोहन जोशी, शिवदास जामोदे, उत्तम दाभाडे, संजय अलाट, शरद गांधी, लक्ष्मण हागे, जय जग्गड, मधु कसबे, मनिष खर्चे, निसार शेख, प्रमोद कढोणे आदि बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: