ताज्या घडामोडी

शिवसेनेच्या आंदोलनास यश सार्वजनिक बांधकाम विभागाने केली कामास सुरवात.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

शिवसेनेच्या आंदोलनास यश सार्वजनिक बांधकाम विभागाने केली कामास सुरवात..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रतिनिधि शरद वालसिंगे
@अकोट.. अकोला
०४/जाने/२०२१
मा.आ.संजयजी गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना गटनेते मनीष कराळे यांनी केलेल्या चिखल बैठो आंदोलनास यश…
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येत असलेल्या रस्ते व नाल्या बऱ्याच दिवसांपासून शासकीय मंजुरात असतांना सुद्धा तसेच कामाचा आदेश दिल्यावरही संबधित ठेकेदाराने काम सुरू न केल्यामुळे रस्तावर मोठं मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत व त्यामध्ये वर्षभर पासून पाणी साचून आहे त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.यासोबत त्या ठिकाणी जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याबाबत वारंवार निवेदन व पत्र तसेच प्रत्यक्ष माहिती दिल्यावर सुद्धा संबधित प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावला नाही.करिता दिनांक ३० डिसेंबर २०२० ला शिवसेना गटनेता मनीष कराळे यांनी मा.आ.संजय गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व प्रभागातील नागरिक तसेच शिवसैनिकांसमवेत प्रभागातील पाणी साचलेल्या जीवघेण्या खड्ड्यात बसून काम त्वरित सुरू व्हावे याकरिता शिवसेना स्टाईल आंदोलन केले होते.व संबधित विभागाला ताकीद दिली होती की या विषयाकडे काळजीने लक्ष देऊन टावरी हार्डवेअर पासून ते सिकवाल हॉस्पिटल पर्यंत तसेच कॅनरा बँक पासून ते अकोट अर्बन पर्यंतचे रस्ते व नाल्यांचे काम त्वरित सुरू करावे.अन्यथा यापुढे शिवसेनेच्या वतीने होणाऱ्या तीव्र आंदोलनास आपण सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार असाल.त्या आंदोलनाला आज दिनांक ०४/जाने/२०२१ ला यश येतांना दिसतेय संबधित कामाला आज प्रत्यक्ष स्वरूपात सुरवात झाली असून त्याठिकाणी आंदोलनकर्ते शिवसेना गटनेते मनीष कराळे व शिवसैनिक पदाधिकारी यांनी भेट देऊन कामाची पाहणी करत सविस्तर आढावा घेतला आहे.यावेळी शिवसैनिक रणजित कहार,नितीन काकड,ज्ञानेश्वर मानकर,अक्षय घायल,नरेश सभागचंदानी,हर्षल शर्मा यांच्या सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
🚩🚩 जय महाराष्ट्र🚩

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: