ताज्या घडामोडी

पणज इथे शेतकऱ्याचा झाडावरील फांद्या तोडत असताना शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू

अकोट तालुक्यामधील पणज येथील शेतकरी पांडुरंग रामराव जी राऊत यांचा गावांमध्ये शेत शिवारात जाण्याचा धामणगाव ते पणज या मुख्य रोडवर बोर्डी नदीच्या किनार ला लागूनच असलेल्या पूला च्या वरच्या बाजूस शेतकरी पांडुरंग रामरावजी राऊत हे झाडाच्या फांद्या तोडत असताना भोकर झाडाच्या मध्यभागातून अकरा केवी व्ही लाईनची जिवंत तार गेलेली असून त्याच तारांमधून विद्युत प्रवाह राऊत यांना शॉक लागून झाडावरून खाली पडल्यावर त्यांचा चेहरा व एक पाय पूर्ण जडला असून त्यांचा जागीच घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला आहे ,

सोमवार दिनांक 4 रोजी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान शेतकरी पांडुरंग रामरावजी राऊत यांचे आज रोजी वय साठ वर्षाचे असून त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व दोन मुली आहेत शेतमजुरी करत असत यावेळी गावातील नागरिकांनी मधील पनज विद्युत उपकेंद्र 33 केव्ही उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या या मुख्य लाईनवर येत असलेली मोठी झाडे व फांद्या तोडण्यात आली नसून ट्री गार्ड तोडण्याचे काम विद्युत केंद्राचे असते त्यांनी हे काम वरच्यावर करायला पाहिजे अशी गावातील नागरिकांची चर्चा सुर येत होता, परिसरातील झाडे या घटनेनंतर आता तरी त्यांनी तोडण्यात यावी अशी गावकऱ्यांनी नागरिकांची मागणी होत आहे, ही घटना हवे सारखी पसरली असता गावातील व परिसरातील नागरिक या घटनास्थळावर धाव घेतली. पटवारी प्रवीण गिल्ले साहेब संजय गवळी पत्रकार, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, ठाणेदार ज्ञानोबा फड साहेब, यांना माहिती कळताच यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी यांनी घटनास्थळावर धाव घेतली , पंचनामा केला असून पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे, परिसरात व पणज मध्ये या दुर्दैवी घटनेची हळहळ व्यक्त होत आहे,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: