ताज्या घडामोडी

नया अंदूरा परिसरात बोंडअळीचे आक्रमण शेतकरी चिंतेत!

अंकित क-हे
बाळापूर तालुका प्रतिनिधी
मो.9579716578

बाळापूर तालूक्यातील गावातील शेतकऱ्यांना विविध नुकसानाला समोरे जावे लागत आहे त्यामध्ये सर्वात प्रथम मुंग, उळीद, तीळ,सोयाबीन, तुर, कपाशी, पिकावर वेगवेगळ्या रोगाचे आक्रमण होत असल्याने बाळापूर तालूक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यांना शासनाने अर्थीक मदत देण्याची गरज आहे, सरकार परंतु महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत अजूनही त्यांच्या निधीतून शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा दिला नाही केवळ काही योजना मंजुर केल्या परंतु अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचल्या नाहीत महाराष्ट्रातील सर्व शेतकरी विविध प्रकारच्या मदतीच्या अपेक्षेत अाहेत त्यांना कोण देणार आर्थिक मदत असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे,महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या योजना पुढील प्रमाणे पुन्हा भूमी न्यूज वर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत (१)मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्ज माफी योजना शेतकऱ्यांच्या पासून दूर(२) पुरग्रहस्थांना जाहीर केलेली मदत त्यांच्या पासून कोस भर दूर(३) शेतकऱ्यांनची कुठल्याही प्रकारची संमंती न घेता पुनरर्गठन केल्याने शेतकरी आर्थिक संकटात (४) दुष्काळ मदत शेतकऱ्यांच्या पासून दूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मदती महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या पासून दूर ठेवलेल्या आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक संकटा उभे राहिलेले आहे ते सुद्धा पुढील प्रमाणे (१) शेतकऱ्यांचे सुरूवातीला मुंग उळीद पिकाचे नुकसान (२) नंतर तीळ पिकाचे नुकसान (३) तुर पिकाचे नुकसान (४) कपाशी पिकाचे नुकसान सुरूवातीला मुंग व उळीद पिकावर अदण्यात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता नंतर सोयाबीन पीकावर सुध्दा अदण्यात रोगाचे आक्रमण झाल्याने तेव्हा सुध्दा शेतकरी चिंतेत तुर पिकावर रोगाचे आक्रमण झाल्याने सध्या तरी शेतकऱ्यांना तुर पीकावर आलेल्या रोगाचे नाव सुध्दा माहिती पडलेले नाही कपाशी पिकावर बोंड अळीचे साम्राज्य पसरल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणत्या प्रकारची पेरणी करावी व कोणते पीक घ्यावे असा प्रश्न उपस्थित होते आहे,शेतकऱ्यांना आपल्या शेतात आलेल्या पीकाला हमी भाव सुध्दा मिळात नाही व व्यापारी लोकांच्या मालाची कीती पट जास्त दराने भाव आहे त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत जसे व्यापारी लोकांच्या मालाची किंमत आहे त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना सुध्दा त्यांच्या मालांची योग्य किंमत मिळाली पाहिजे असे सुध्दा शेतकरी अपेक्षा करीत आहेत,अजूनही बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षापासून अनेक योजना व आर्थिक मदत मिळाली नाही आहे ते म्हणजे की मागील वर्षाची बोंड अळीची आर्थिक मदत नंतर मागील वर्षाचा पीक वीमा शेतकऱ्यांना मिळाला नाही व पिएम किसन योजनेचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत एक वर्षापासून बाकी आहे तर चालू वर्षाची आर्थिक मदत केव्हा मिळाणार आहे असा प्रश्न बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष,.बाळापूर तालूक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनचे सर्व पीके उध्वस्त झाले व बाळापूर तालूक्यात अोला दुष्काळ जाहीर करावा व बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा बाळापूर तालूक्यात तिव्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी दिली आहे
गणेश भाऊ खूमकर रा.हाता जिल्हा अध्यक्ष,.नया अंदूरा गावातील शेतकरी माझ्या शेतातील सोयाबीन, कपाशी ,मुंग ,उळीद,पिकाची पेरणी केली असतांना परतीच्या पावसाने अतोनात नुकसान केल्याने बाळापूर तालूक्यात अोला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी अशी माहिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकरी सत्यम झाडे रा.नया अंदूरा,.बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना तातडीने अोला दुष्काळ किंवा मागील वर्षातील सर्व योजना व आर्थिक मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बाॅंक खात्यात जमा करावी नाहीत बाळापूर तालूक्यातील सर्व शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बाळापूर तहसिलदार कार्यालय तिव्र आंदोलन सुरू करून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी माहिती समोर आली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: