ताज्या घडामोडी

अकोला येथील श्रिराम शोभा याञा समितीचे कार्य हे राष्टीय कार्यात नेहमी अग्रेसर ….. गोंवीदगीरी महाराज

रामजन्मभूमि न्यास कोषाध्यक्ष .. बाळासाहेब नेरकर कडून
भारत हा जगात महाशक्ती शाली राष्ट्र निर्माण होऊन जगाला मार्गदर्शक प्रभुरामचंद्रांचा मंदिर निर्माण झाल्यानंतर श्री रामनवमी शोभायात्रा समिती प्रभू रामचंद्राच्या अभिप्रेत कार्य करून समाज निर्माणाचे कार्य करीत असल्यामुळे व श्रिराम नवमी शोभा याञा समितीने दिलेल्या चांदीच्या विटा प्रभू रामचंद्राच्या गर्भगृहात उपयोगी पडेल असे प्रतिपादन श्री राम जन्मभूमि न्यास कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज परमहंस यांनी केले श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने राजराजेश्वर नगरीच्या नागरिकांच्या वतीने नऊ चांदीच्या विटा प्रभु रामचंद्राच्या मंदिर निर्माणात योगदान समर्पण कार्यक्रम नागपूर विद्याविहार प्रताप महाराणा प्रताप चौक येथे ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विलास अनासने ब्रिज मोहन चितलांगे विजय कछवाह विजय वर्णेकर हे होते अकोल्यात श्री रामनवमी शोभायात्रा समिती यांना मदत देण्याचे काम राष्ट्रचेतना जागृतीचे काम सातत्याने करून हिंदू समाजाला एकत्रित करण्याचे काम करून समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहे या समितीचे सर्व पदाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा व सर्व पदाधिकारी यासाठी साधुवाद असल्याचे गोविंद गिरी महाराज यांनी सांगून राम जन्मभूमी पाचशे वर्षापासून सुरु असून आपण भाग्यवंत आहे की या आपल्या काळामध्ये प्रभुरामचंद्रांचा विशाल मंदिर निर्माण होत आहे व यासाठी पाच ऑगस्ट रोजी संकल्प करून विटा विधिवत पूजन करून राम मंदिर निर्माण कार्यात खारीचा वाटा उचलल्या बद्दल त्यांनी समितीच्या या कार्याची प्रशंसा केली प्रत्येक भारतीय नागरीकांचा योगदान यामध्ये असावा यासाठी 14 जानेवारीपासून अभियानात सुद्धा सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने एक चांदीची वीट तसेच गोवर्धन शर्मा परिवार मनोज खंडेलवाल अश्विनी हातवळणे अनुराग अगरवाल राम भज गुप्ता परिवार विलास अनासने चेतन सुरेखा श्रीमती कांता देवी गोइंनका ब्रिज मोहन चितलांगे पाठक परिवार यांच्यावतीने चांदीच्या विटा श्रीराम मंदिराच्या कार्यासाठी संकलित करण्यात आले आहे श्री गोविंद गिरी महाराज हे चांदीच्या विटा श्रीराम जन्मभूमी न्यासचे सचिव चंपतराय यांच्याकडे सुपृत करणार आहे कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी प्रास्ताविक अनिल मानधने आभार प्रदर्शन गिरीराज तिवारी यांनी केले यावेळी नितीन जोशी राम ठाकूर अजय पांडे शैलेश राठोड प्रवीण मानकर प्रमोद जावर कार मोहन गुप्ता शंकर खोवाल मोठ्या संख्येने उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: