ताज्या घडामोडी

मरखेल ता. देगलूर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस कृषी महाविद्यालय व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती देगलूर आणि कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

मरखेल ता. देगलूर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस कृषी महाविद्यालय व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती देगलूर आणि कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरिता मार्गदर्शन सत्राचे आयोजन..

मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
दि.27-12-2020 रोजी मरखेल
ता.देगलूर येथे नेताजी सूभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय,पशु संवर्धन विभाग पं.स.देगलूर आणि कृषी विज्ञान केंद्र,सगरोळी यांच्या संयूक्त वतीने मरखेल आणि परीसरातील दुध उत्पादक शेतक-यां करीता एक दिवसीय मार्गदर्शन तथा चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.पहिले सत्र कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे होते.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री.शिवाजीराव देशमुख; बळेगांवकर (मा.सभापती,पं.स.देगलूर, तथा संचालक नां.जिमस बॅन्क ) होते.कार्यक्रमाचे नियोजीत अध्यक्ष मा.श्री.लोकनेते व्यंकटरावजी पाटील; गोजेगांवकर ( अध्यक्ष,भाजपा,नांदेड)यांना कांही अपरीहार्य अडचणीमुळे नांदेडला जावे लागल्यामूळे श्री.बबनरावजी पाटील,गोजेगांवकर संचालक ने.सू.बो.कृषी महाविद्यालय,यांना अध्यक्षपद भूषवावे लागले.या सत्रात मार्गदर्शक म्हणून लाभलेले तज्ञ शेतकरी तथा दुध उत्पादक प्रा.श्री.भगवान सावंत,कषी विज्ञान केन्द्र येथील विषय तज्ञ डॉ.निहाल अहमद मुल्ला,प्रा.सचीन नाईक विभाग प्रमुख,नेसूबो कृषी महाविद्यालय तसेच पं.स.देगलूरचे पशुधन विकास आधिकारी डॉ.तोटलवार आणि शगून फुड्स आणि बेवरेजस ला दुध पुरवठा करणारे दुध उत्पादक यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी शगून फुड्स च्या वतीने श्री.नरसिंग देशमुख यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू प्रास्ताविकातून व्यक्त केला.याच कार्यक्रमात देगलूर येथील सामाजीक कार्यकर्ते श्री.सय्यद मोहियोद्दीन साहेब यांचा सत्कार जिल्हा पक्फ़ बोर्डावर नियूक्ती झाले बद्दल करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.शिवाजीराव देशमुख यांनी उपस्थीत दुध उत्पादक शेतक-यांना संबोधीत केले.अशा प्रकारच्या मार्गदर्शन व चर्चासत्राच्या आयोजना बद्दल शगून फुड्स चे कौतुक केले.समयोचीत उचीत शब्दात श्री.बबन पाटील यांनी पहिल्या सत्राचा समारोप केला.द्वीतीय सत्रात नेसूबो कृषी महाविद्यालयातील पशु संवर्धन विभाग प्रमुख,श्री.सचीन नाईक यांनी दुध उत्पादक शेतक-यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर तज्ञ शेतकरी तथा दुध उत्पादक प्रा.भगवान सावंत यांनी सोप्या आणि सहज भाषेत उपस्थीत दुध उत्पादक शेतक-यांशी संवाद साधत आहे त्या परीस्थीतीत जनावरांच्या संगोपनाचे सुत्र समजाऊन दिले.त्याच बरोबर सोप्या पद्धतीने मुक्त गोठा पद्धती बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.तिसरे सत्र कृविकें सगरोळी चे विषय तज्ञ डॉ.निहाल अहमद मुल्ला यांनी स्लाईड शोचा वापर करुन शेतक-यांना जनावरांची निवड,निगा आणि दुधातील स्नीग्धांश वाढवण्या बद्दल सखोल माहिती दिली.
या मार्गदर्शन शिबीरा करीता मरखेल आणि परीसरातील वळग,टाकळी,सावळी,बेनाळ, काठेवाडी या गांवातील पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.या सर्व शेतक-यांच्या जेवण आणि चहापानाची चोख व्यवस्था ने.सू.बो.कृषी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्र संचलन आणि आभार श्री.सय्यद मोहियोद्दीन यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: