ताज्या घडामोडी

मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीमध्ये रणधुमाळी सुरू.. एक लाख 69 हजार 812 मतदार बजावणार मतदानाचा हक्क.

मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीमध्ये रणधुमाळी सुरू.. एक लाख 69 हजार 812 मतदार बजावणार मतदानाचा हक्क.

मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायतीची निवडणूक रणसंग्राम सुरू झाले असून निवडणूक विभागाकडून दिनांक 23 डिसेंबर 2020 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी कोरोना प्रादुर्भाव संदर्भात गांभीर्याने सर्व काळजी घेत तहसील कार्यालयातील प्रांगणात टेन्ट टाकून गर्दी टाळण्यासाठी 26 टेबलवर 26 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 26 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 108 ग्रामपंचायती पैकी 349 वॉर्डातून इच्छुक उमेदवारांनी निवडणुकी साठी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही. दुसऱ्यादिवशी दिनांक 24 डिसेंबर रोजी पंचवीस नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. या निवडणुकीत 108 ग्रामपंचायत गावातील एक लाख 69 हजार 812 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचबरोबर 25 डिसेंबर पासून सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टी असल्याकारणाने शेवटच्या तीन दिवसात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू असून संगणक केंद्रावर ऑनलाइन नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर निवडणुकीसाठीची वेबसाईट पहिल्या दिवशी पासूनच संथ गतीने चालत आहे याबद्दल ग्रामस्थांनी ऑनलाईन प्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे 30 डिसेंबर 2020 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे यासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील सर नायब तहसीलदार श्री महेश हांडे सर एस एस मामीलवाड पेशकार गुलाब शेख व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागाचे प्रशांत लिंबेकर सर सह आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: