ताज्या घडामोडी

एकविरा स्कूलच्या प्राचार्यांनी केले गरजूंना ब्लँकेट वाटप (दरवर्षी असतो एकशे एक ब्लॅंकेट व स्वेटर वाटपाचा संकल्प)

एकविरा स्कूलच्या प्राचार्यांनी केले गरजूंना ब्लँकेट वाटप
(दरवर्षी असतो एकशे एक ब्लॅंकेट व स्वेटर वाटपाचा संकल्प)
प्रतिनिधी-गौरव टोळे
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा प्राचार्य श्री तुषार चव्हाण एकविरा स्कूल यांनी अमरावती सह दर्यापूर मधील गरजु व गरीब लोकांना आज ब्लँकेट चे वाटप केले दर वर्षी ते कुठलीही प्रसिद्धी न घेता वेगवेगळ्या शाळे मधील गरीब विद्यार्थ्यांना शालेय पोशाखाचे व शालेय वस्तूंचे सुद्धा वाटप करत असतात. काल त्यांनी अमरावती मधील जयस्तंभ चौक राजापेठ इतवारा बाजार कठोरा नाका इर्वीन चौक सुंदरलाल चौक इत्यादी ठिकाणी रोडच्या कडेला असलेले गरीब व वृद्ध म्हातारा वर्ग यांना सुद्धा त्यांच्या पत्नीने व त्यांनी स्वतः ब्लँकेटचे वाटप केले दरवर्षी त्यांचा 101 ब्लॅंकेट वाटपाचा संकल्प असतो तसेच गरजूं विद्यार्थ्यांना व गरीब विद्यार्थ्यांसाठी ते शालेय पोशाखाचे सुद्धा ते वाटप करत असतात मायेची ऊब हा त्यांचा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी त्यांच्या
वडीलांनपाठोपाठ सुरू ठेवला आहे त्यांना वडिलांनी दिलेली शिकवण आजपर्यंत त्यांच्या मनामध्ये ठासून भरली आहे वडिलांचा समाजकार्याचा वारसा चालवत हा स्तुत्य उपक्रम त्यांनी गेल्या दहा वर्षापासून सुरू केला असल्याचे यावेळी सांगितले आहे मानव सेवा हीच ईश्वर सेवा या जित्याजागत्या उदाहरणाने प्रेरित होऊन गरीब व गरजू व्यक्तींना आपल्या कमाई मधील काहीसा वाटा देण्याचे त्यांनी संकल्प केले आहे.गरजू लोकांना वाटप करण्याचा त्यांचा हेतू हा प्रामाणिक व सढळ असून मानवतेची व सामाजिकतेची शिकवण देते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: