ताज्या घडामोडी

आदिवाशी गोंडगोवारीना आठ दिवसात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र आ अडसड यांची तपासणी समिती कार्यालयात धडक

न्युज पुण्यभुमी प्रतीनीधी
पवन ठाकरे धामक
मो ८८८८४२३३२३
धामक अमरावती विभागातील आदिवासी गोंडगोवारी विद्यार्थी व कर्मचारी यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून धामणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी अमरावती जात वैधता तपासणी समिती कार्यालयात धडक देऊन आपण आदिवासी गोंडगोवारी विध्यार्थी व कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र कधी देणार, किती प्रकरण निकाली काढले, किती प्रलंबित आहे जर आपण वैधता प्रमाणपत्र देत नसेल तर विधानसभेत प्रश्न मांडावा लागेल तसेच आदिवासी विकास मंत्र्यांशी भेटावे लागेल असे सहाय्यक आयुक्त गिरी यांची भेट घेऊन आक्रमक विषय मांडला आठ दिवसात नीट, सीईटी च्या उत्तीर्ण विध्यार्थ्यांना व काही कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देणार असल्याचे आश्वासन सहाय्यक उपायुक्त गिरी यांनी आमदार अडसड यांना दिले आदिवासी गोवारी समन्वय समितीचे राज्याध्यक्ष शालीक नेवारे यांनी आमदार अडसड यांच्याकडे हा गंभीर विषय मांडला होता.आज जात वैधता तपासणी समिती कार्यालयात यावेळी पुंडलिक चामलोट, मारोतराव वाघाडे, भाऊराव चौधरी ,पुरुषोत्तम वाघ, सूर्यभान सहारे यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: