ताज्या घडामोडी

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातही आता राष्ट्रीय विचारांची रुजवणूक होणार•

•अलिगढ मुस्लिम विद्यापीठातही आता राष्ट्रीय विचारांची रुजवणूक होणार•

AMU अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी भारतातील एक नावाजलेलं विद्यापीठ भारताच्या शैक्षणिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करणारे कितीतरी विद्वान लोकं या विद्यापीठाने दिले आहेत पण तसं पाहिलं तर हे विद्यापीठ नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेलंच भारतीय जनतेने पाहिलं आहे.

आज या विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाले भारतातील राजकीय नेत्यांपैकी या आधी देशाचे दुसरे प्रधानमंत्री मा.लालबहादूर शास्त्री यांनी फक्त मंचावर उपस्थिती लावली होती पण आज दुसऱ्यांदा देशाचे विद्यमान पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी आणि देशाचे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री आणि आपले अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.संजयभाऊ धोत्रे आज या विद्यापीठाच्या 100 वर्ष पूर्ती कार्यक्रमात मंचासीन आहेत ही अभिमानाची बाब आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ हे JNU सारखंच लेफ्ट विचारांचं आणि राष्ट्रीय विचारांच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांचा अड्डा मानला जातो देश हिताच्या निर्णयाच्या विरोधात कायम या विद्यापीठातून विरोध केला जातो समाजात तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक विधान येथील विद्यार्थी नेत्यांकडून दिली जातात अगदी या कार्यक्रमात मा.पंतप्रधान यांना सामील होऊ देणार नाही या भूमिकेत ह्या विद्यार्थी संघटना अग्रेसर होत्या पण ही विरोध करणारी मंडळी देखील भारत देशाचे नागरिक असल्याने आणि विचारांची लढाई ही विचारांची लढावी लागते हे योग्य प्रकारे जाणणारे मा.मोदीजी आज त्यांचा विरोध होणार हे स्वीकारून तिथे उपस्थित राहिलेत आणि आपले विचार हे विरोध करणाऱ्या लोकांपर्यंत देखील पोहोचवले ही अभिनंदनीय आहे आणि विरोध सगळ्यांना त्यांच्या विरोधाला चांगलंच उत्तर AMU प्रशासनाने दिल असून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात देखील आता राष्ट्रीय विचार सरणीची रुजवणूक यामाध्यमातून होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मा.संजयभाऊ धोत्रे यांनी अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल करू सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू केला आहे.देशाच्या इतिहासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक व नामदार संजय भाऊ धोत्रे यांनी जनतेचे मत जाणून कार्य सुरू केले covid-19 मध्ये सुद्धा अनेक नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्राला एक नवीन दिशा देण्याचं काम मा.मोदींच्या नेतृत्वात मा.शिक्षण राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे यांनी केले.

राष्ट्रीय विचारसरणी चा प्रचार प्रसार करण्यात केंद्रीय राज्यमंत्री संजीव धोत्रे यांची महत्त्वाची भूमिका असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत व राष्ट्र भक्तांना अभिप्रेत कार्य करण्यासाठी संजयभाऊ धोत्रे कार्यरत आहे अकोला लोकसभा मतदारसंघाच हे सौभाग्य आहे की देशाच्या इतिहासात प्रथम राज्यमंत्री पद प्राप्त होऊन अकोल्याच्या इतिहासामध्ये व देशाच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी संजू भाऊ बजावत आहे आणि त्याचेच फलित म्हणून AMU च्या कॅम्पस मध्ये मा.मोदीजींच्या समवेत संजूभाऊ राष्ट्रीय विचारांची रुजवणूक करण्यात हातभार लावत आहेत.

मा.संजूभाऊ आम्हा अकोलेकरांना आपला सार्थ अभिमान आहे..!!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: