ताज्या घडामोडी

एसटी बस चालकाचा हृदयविकाराने चालू ड्युटी मध्ये निधन..

मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी मो.9960757871

देगलूर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या एसटी बस चालकाचा काल दिनांक 12 डिसेंबर 2020 रोजी देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील टोल नाक्याजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना लगेच देगलूर येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. औराद आगाराची ही बस औराद ते नांदेड जाण्यासाठी सकाळी 11 वाजता देगलूरच्या नवीन बस स्थानकावरून नांदेड कडे जाण्यासाठी निघाली असता देगलूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वन्नाळी टोलनाक्याजवळ येतात बस चालक मकबूल शेख वय 48 वर्ष त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्यामुळे बस लगेच रस्त्याच्या बाजूला त्यांनी घेतली. प्रवाशांनी त्यांना देगलूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले त्यानंतर शवविच्छेदनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या मृतदेह स्वाधीन करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: