ताज्या घडामोडी

उपविभागीय कार्यालय महावितरण येथे जागतिक अपंग दिवस उत्साहात साजरा


पवन ठाकरे
शहर प्रतिनीधी
नांदगाव खंडे
आज दि 3 डिसेंबर 2020 रोजी उपविभागीय कार्यालय नांदगांव खंडेश्वर येथे जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला उपविभागीय कार्यालया अंतर्गत कार्यरत दिव्याग कर्मचारी सुरक्षा रक्षक यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्री राजेश तोमर हे होते सत्कारमूर्ती श्री विवेक कोहळे सुरक्षा रक्षक 33 के व्ही उपकेंद्र शहर व कु सुनंदा ढोरे वरिष्ठ तंत्रज्ञ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता श्री प्रतीक ढवळे श्री मनोज बनारसे श्री अमित पंचगव्हानकर श्री अमर जाधव श्री हेमंत जावरकर कु ममता घरडे सौ वर्षा राउंत श्री नितिन भुजाडे श्री अक्षय कुसुमबीराज कु शारदा ढगारे कु अश्विनी वानखडे श्री रामकृष्ण वाढवे श्री फिरोजभाई श्री रवि शिंदे श्री मनोज लेंडे हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्री मनोज बनारसे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री हेमंत जावरकर यांनी केले
अपंग दिन हा संपूर्ण जगामध्ये 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो व पहिला अपंग दिवस जगामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 1992 ला साजरा केला जनसामान्यांमध्ये अपंगां बद्दल जनजागृती व्हावी त्याच्या कार्याची कामाची दखल घेतली जावी या करिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले….

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: