ताज्या घडामोडी

दिव्यांगाच्या प्रतिनिधी विधान परिषदेवर घ्या विभागीय अध्यक्ष संजय बरडे यांची मागणी.

अकोला:- दिनांक 3 डिसेंबर महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अकोला च्या वतीने संघटनेच्या कार्यालय हेड पोस्ट ऑफिस जवळ अकोला येथे दिनांक 3 डिसेंबर 2020 ला जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बोलत असताना अपंगाच्या एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घ्यावा अशी मागणी संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष संजय बर्डे यांनी केली आहे प्रातिनिधिक ऑनलाईन पद्धतीने मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत covid-19 नियम पाळून व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सदर कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे कोषाध्यक्ष अविनाश वडतकर तर प्रमुख पाहुणे सचिन शेजव ,बाळासाहेब नेरकर, राम शेगोकार, संघटनेचे सचिव मोहम्मद अजीज ,कोषाध्यक्ष दिलीप सरदार ,दिव्यांग संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुधीर कडू ,रवींद्र देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉक्टर नीलिमा आमले माधुरी देठे अकोला मनपा उपायुक्त पुनम ताई कळंबे कृषी अधिकारी जिल्हा परिषद अली साहाबआदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुरुवातीला संघटनेच्या पाच पाच सदस्य असलेल्या गटाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला अधिष्ठाता मा.शिवहरी घोरपडे ,जिल्हा शल्य चिकित्सक माननीय राजकुमार चव्हाण, मनपा उपआयुक्त मा.पुनम कळंबे मॅडम,जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री रामेश्वर वसतकर,शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर वैशाली ठग मॅडम, माननीय पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मा.श्री प्रकाश अंधारे वै.सी.का.माननीय पुंड साहेब,जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले,आदी अधिकारी वर्गाचा त्यांच्या कार्यालयात जाऊन संघटनेचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला स्थानिक कार्यक्रमात कोरोना योद्धा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधवांच्या प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान चित्र देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये दैनिक सकाळचे विवेक मेतकर दैनिक मातृभूमीचे राम व्यास दैनिक देशोन्नती चे वंदना शिंगणे मॅडम दिव्य मराठीचे अजय डांगे दैनिक लोकमत राहुल सोनवणे समाधान इंगळे तसेच mcn न्यूज चॅनल व महासागर चे बाळासाहेब नेरकर आधी पत्रकारां समावेत उत्कृष्ट कर्मचारी वंदना चौधरी कोरोना योद्धा ज्ञानेश्वर माकोडे,किशोर ठेंग, देवानंद बांगरे,वर्षा माहुरे,अजय शिंपीकर,तसेच ऑनलाइन पद्धतीने नारायण तुकाराम मडके जिल्हा कोल्हापूर यांचा सत्कार करण्यात आला यानंतर उपस्थित अतिथींचे मार्गदर्शन ऑनलाइन पद्धतीने व फेसबुक लाइव्ह दाखवण्यात आले सदर कार्यक्रमाचे नंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानपरिषदेवर दिव्यांगा चा प्रतिनिधी घेण्याबाबत महामहिम राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी अकोला यांचेमार्फत निवेदन देण्यात आले या कार्यक्रमाला रवींद्र शिरसाट,अनुप तायडे,शबाना पटेल, गणेश अत्तरकार,सुरेश मसने, संजय कचाले,सुनील कवळे, रामेश्वर कवडे,श्रीकांत देशमुख जिल्हाध्यक्ष दिव्यांग बेरोजगार संघटना अनिलअ सरदार,अमोल राठोड, मनोज भगत,रंजना घोराडे, सुभाष चौरे ,राजेश रौंदळे ,सचिन मानकर राकेश सावळे धर्मेश मिञा शेख अजहर मीना बोचरे ,उज्वला शर्मा ,मीरा दिघोडे ,अनुराधा शेंडे ,अर्चना देशमुख, प्रतिमा आपोतीकर सुनीता राऊत सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व सचिव आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते कार्यक्रमाची व्यवस्था मुस्ताक पटेल योगेश चतरकार, मनोज तेलगोटे यांनी पाहिली कार्यक्रमाचे संचालन दिलीप सरदार यांनी तर आभार सुनील वानखडे यांनी मानले.कार्यक्रमानंतर दिव्यांग वीकास आघाडी कडुन सालाबाद प्रमाने सजय बरडे वअजीज सर याचे हस्ते व बाळासाहेब नेरकर कीशोर तिवारी सूहास चवरे कैलास अमृतकार प्रमोद जोशी याचे वतीने व सुधीर कडू या ऐकीकृत दिव्यांग समन्वय समीती पधाधिकारी च्या हस्ते साडी चोळी कपडे व ब्लकेट वाटप करन्यात आला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: