ताज्या घडामोडी

ठाकरे सरकार सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले कुचकामी सरकार


आमदार नाईक यांचे प्रतिपादन
अकोला
महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते आमदार निलय नाईक यांनी केले. अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल आमदार प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, तेजराव थोरात, महापौर सौ अर्चनाताई मसने, भाजपा प्रवक्ता व नगर सेवक गिरीश जोशी आदी उपस्थित होते.
आ. नाईक म्हणाले की मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला नीट बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिरायत शेतीसाठी 25,000 आणि बागायती शेतीसाठी 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. फळबागांसाठी एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. सत्तेत आल्यावर आपण काय बोललो होतो , याचा विसर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे असे ही या वेळी आमदार नाईक यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही.तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने ३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पॅकेज जाहीर केले. सामान्य माणसाला भरमसाठ वीज बिले पाठविली गेली आहेत. वीज बिल माफ करण्याचे आश्वासनही या सरकारने पाळले नाही. पत्रकार अर्णब गोस्वामी , अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर केलेल्या कारवाईने आघाडी सरकार सूडबुद्धीने काम करते आहे , हेच दिसले आहे. समाज माध्यमांमधून या सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आ नाईक यांनी या वेळी केला.

..२..
ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले, या सरकारच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील. घरात बसून राज्यकारभार हाकणारा मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचे दुःख , हालअपेष्टा जाणून घेऊ शकतच नाही. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहाराबाबत आरोप होत आहेत. मात्र मुख्यमंत्री त्याबाबत चकार शब्दही उच्चारण्यास तयार नाहीत. जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या या सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अकोला जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांची ४०० पदे भरण्याकरिता मंजुरात दिली नाही. अकोला,वाशीम, बुलढाणा जिल्ह्यांना उपयोगी पडणारे क्रीडा सांस्कृतिक भवन निधी अभावी काम थांबले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्क रोग हॉस्पिटल, तहसील कार्यालय इमारतींचे काम थांबले आहे. सिंचानानांच्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम महानगर पालिका व नगर पालिकांना एक दमडीची ही मदत नाही उलट शासनाने विकास कामे थांबवून चौकश्या लाऊन अधिकाऱ्यांना काम करू देत नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अकोल्याचे अभ्यासू जिल्हाध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी खारपान पट्ट्यासाठी विदर्भ व मराठवाडा विकासासाठी व शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या योजना मंजूर करून घेतल्या परंतु या योजनेचे ही तीन तेरा या सरकारने केले आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानांचा पंचेनामे केले नाहीत, १ जानेवारी ते ३० सप्टेंबर पर्यंत शासनाकडे जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेले नुकसान भरपाई प्रस्तावांचे ३६ कोटी रुपये अजून सरकारने दिले नाहीत. सिंचन दुरुस्ती प्रकल्पांसाठी ३ कोटी रुपयाची मागणी केल्यावर केवळ २६ लाख रुपयाचा निधी देऊन अन्याय केला. आमदार शर्मा यांचा निधी इतरत्र वळविण्याचा प्रकार तसेच २५१५ अंतर्गतची कामे थांबवून ग्रामीण विकास थांबविला असे ही आमदार नाईक यांनी सांगून अनेक विकास कामांना थांबविले आहे. विमानतळ निधी दिला नाही असा ही आरोप भाजपा नेत्यांनी या वेळी केला.
या वेळी माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर, संजय जीरापुरे, डॉक्टर शंकर वाकोडे मनीराम टाले डॉक्टर अमित कावरे, राहुल देशमुख, अंबादास उमाळे, राजेंद्र गिरी, सतीश ढगे, अ‍ॅड. देवाशिष काकड आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: