ताज्या घडामोडी

🩸 वरूर येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न 🩸


अकोट तालुक्यातील श्री.शिवराम महाराज पवार यांच्या नावाने वरूर गाव प्रसिद्ध आहे.
याच अनुषंगाने कार्तिक सोहळा निमित्त खूप भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन होत असते.या निमित्याने हनुमान मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समस्त गावकरी वरुर व साई जीवन रक्तपेढी अकोला यांच्या वतीने घेण्यात आले.यामध्ये सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.व दीप प्रज्वलन केले.
या शिबितीला श्री.ह.भ. प.वासुदेव महाराज खोले, ह.भ.प.गणेश महाराज शेटे,श्री.आशिष महाराज जायभाये,तसेच श्री.विपुल माने, श्री.तुळशीदास नायसे यांनी भेट देऊन युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.आणि या शिबिर मध्ये एक महीला व एकूण सदोतीस तरुण युवकांनी असे एकूण अडोतीस व्यक्तींनी रक्तदान केले.आणि कार्यक्रम हा कोरोणा च्या पार्श्वभूमीवर उत्तम रित्या पार पाडला.
यामध्ये विक्रम अवारे,पवन पाचपोहे,उज्वल शर्मा,विजय बोरोकार,गणेश पडोळे, अक्षय पाचपोहे,सोपान उकरडे,चेतन रामेकर,भूषण सीरसाट,शुभम ओखारे,रवी गायगोळ,पंकज वानखडे,रोहित ओखारे, पवन कात्रे,निलेश घुटे,सुभाष घनबहादुर, चेतन डोईफोडे,एकनाथ कडूसे,महेश ढाकणे, ज्ञानेश्वर अवारे, वैभव नायसे,गोपाल पडोळे,विलास पडोळे,नागेश लिंगोट,नागेश पाचपोहे,वैभव कराळे,शिवशंकर गावंडे, बंटी पडोळे, सुमित घुटे,स्वप्नील रामेकर,गौरव वानखडे ,निलेश वाघ,अरुण वानखडे,आश्विन कावोकर,योगेश ओखारे, महिला मध्ये सौ.कल्पना जगदीश बहाळ,यांनी दिले.
तर या कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्र ,अकोला चे तालुका स्वयंसेवक शिवकुमार राऊत,व अबू कलाम ,आणि राजू ढाकणे, ज्ञानेश्वर उकरडे,गोपाल पडोळे,गणेश वानखडे, राम कृष्ण कात्रे,निखिल अवारे,गणेश ढाकणे,प्रथमेश बहाळ, राहुल खोले, गणेश बोंडे. योगेश मनसुटे फिटनेस सेंटर,विवेकानंद युवा बहुउद्देशिय मंडळ, स्वराज्य ग्रुपचे यावकानी परिश्रम घेत हे शिबिर पार पाडले,
शेवटी वैभव नायसे यांनी आलेल्या सर्व मंडळीचे, सर्व ,तरुण युवक मित्र परिवार व साई जीवन रक्तपेढी अकोला यांचे आभार व्यक्त करत शिबिराची सांगता केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: