ताज्या घडामोडी

सावरा येथे बायपास रोडची मागणी

 पुण्य भुमी न्युज 
  गजानज राऊत
 अकोट तालुका ग्रामीण प्रतिनिधी 
मो, क्र.9850045198

सावरा – अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथे दिवसेंदिवस वाहन धारकाची संख्या प्रचंड वाढत आहे.विशेषतः शहापूर बृहूत आराखडया अंतर्गत नावाने झालेले मोठे धरणामुळे आजूबाजूच्या परिसरातील पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्या मुळे सावरा गावातील मेन रोडवर कदाचित अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापुर्वी सदर बायपास रस्ता संदर्भात मोजमाप व पाहणी सुध्दा झाली होती . पुढे काय झाले हा प्रश्न शासनाच्या लालंफीतीत अडकला आहे .तरी सावरा ग्रामस्थांची गावाच्या बाहेरून बायपास रोड ची मागणी जोर धरत आहे. सदर प्रश्न संबंधात माननीय उपविभागीय अधिकारी यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. तरी महसूल प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी यांनी सदर गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी सावरा ग्रामस्थांनी केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: