ताज्या घडामोडी

जिल्ह्यात बोंण्डअळी व बोंण्डसड मूळे प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्राची पाहणी

अकोट तालुका प्रतिनिधी
देवानंद खिरकर = अकोट मा.कृषी सहसंचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे यांनी मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना कृषी विद्यापीठातील किटकशास्त्रज्ञ व वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांना सोबत घेऊन समिती गठीत करून जिल्ह्यात बॉण्डअळी व बॉण्डसड मुळे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राची पाहणी करून उद्भवलेल्या रोगांचा कारणमीमांसा,नियंत्रणाच्या उपाययोजना यासंदर्भात संबंधित तज्ञांच्या शिफारशी सह अहवाल सादर करण्यास कळविले होते. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अकोला श्री उदय नलावडे यांनी उपविभागीय कृषी अधिकारी अकोला कांतप्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काही भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.त्या अनुषंगाने अकोट तालुक्यातील मौजे टाकळी वसू व मौजे हनवाडी येथे पाहणी करण्यात आली.यावेळी जी के लांडे कीटकशास्त्रज्ञ, मोहन तोटावार ,वनस्पती रोगशस्त्रज्ञ,सुशांत शिंदे तालुका कृषी अधिकारी अकोट, मिलिंद वानखेडे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा,दीपक तायडे तालुका कृषी अधिकारी बार्शीटाकळी,मिलिंद सदांशीव कृषी सहाय्यक,नारायण साबळे कृषिमित्र उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: