ताज्या घडामोडी

भोईराज पुण्यतिथी संपन्न…

..
शहर प्रतिनिधी अकोट.
देवानंद खिरकर = सालाबादप्रमाणे यंदाही भोईराज भवन भोईपुरा पणज येथे दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी पाच वाजता स्व. किसनराव तायडे यांची पुण्यतिथी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून साजरी करण्यात आली.अकोटचे उपविभागीय अधिकारी श्री.श्रीकांत देशपांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व ऊधोजक श्री विजय दातीर,प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ श्री. सुहास कुलट,वह्राळी कवी श्री.विठ्ठल कुलट निसर्गोपचार संस्था आकोला चे सचिव डॉ.काशिनाथजी दाते कॅलेंडर चे निर्माता रतनलाल भोई यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तसेच 2007 पासून भोईराज यांचे स्मृतिप्रित्यर्थ संपूर्ण भारतात मोफत वाटण्यात येणाऱ्या भोईराज कॅलेंडर 2021 चे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते लॉकडाऊन चे सर्व नियम पाळून करण्यात आले. पाहुण्यांचे सत्कार डॉ. मयुरदादा तायडे,डॉ. दर्शनकुमार तायडे,इंजिनिअर कपीलकुमार तायडे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन तंटामुक्ती अध्यक्ष रामदासभाऊ तायडे व मा. सरपंच सौ. सविता तायडे यांनी केले संचलन कवी विठ्ठल कुलट तर आभार प्रदर्शन भोईराज कॅलेंडर चे कार्यालय प्रमुख सुरजकुमार तायडे यांनी केले. असे कॅलेंडर च्या मुख्य संपादिका सौ.रुख्मीणीदेवी यांनी कळविले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: