ताज्या घडामोडी

दिवाळी च्या दिवशी युवाशक्ती संघटनेचे अन्नत्याग आंदोलन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
मो.९६२३३४४९९३

तेल्हारा: – दिवाळी म्हटली की आनंदाचा पर्व या पर्वात खरेदारी सोबतच गोडधोड असे फराळाची एक वेगळीच मज्जा असते मात्र ऐन दिवाळीच्या दिवशी तालुक्यातील विविध समस्यांसाठी अन्नत्याग आंदोलन युवाशक्ती संघटना करीत आहे ही लोकप्रतिनिधी व प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब ठरली आहे .
जुलै ते ऑक्टोबर दरम्यान वेळी अवेळी आलेल्या त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन व कपाशीला तर उत्पादनखर्चही निघणे शक्य नाही त्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने नापिकीचे वर्ष आहे असे असले तरीही ही तालुक्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत निधीमधून वगळल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या अत्यंत हवालदिल झाला असून त्याला शासनाने तातडीची मदत देणे गरजेचे आहे तसेच तेल्हारा तालुक्यातील चोहीकडील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे रस्त्यामधील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात आतापर्यंत झालेले आहेत आहेत या अपघातांमध्ये आतापर्यंत तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत रस्त्यावरील धुळीमुळे प्रवास करणेही कठीण झाले असून धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची तसेच धीम्या गतीने होत असून याच मुद्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवाळीच्या दिवशी युवाशक्ती संघटनेच्या वतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन स्थानिक सेठ बन्सीधार विद्यालयाच्या गेट समोर करण्यात आले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: