ताज्या घडामोडी

बळिराजाने कापसाच्या शेतात फिरवला नांगर


संग्राम पाटील तांदळीकर
मो 7066166695
मुखेड तालुका प्रतिनिधी
अतिवृष्टी व बोंडअळीने बाधित झालेल्या कापसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कापसाच्या झाडांचे पानगळी व बोंडे गळून गेल्याने शेतकरी कापसाच्या शेतात नांगर फिरवत आहे मुखेड परिसरातील कोरडवाहू शेतीचा परिसर आहे मुखेड परिसरातील शेतकऱ्यांची उपजीविका लहरी निसर्गाच्या पावसावरच असलेल्या खरीप पेरणी हंगामावर अवलंबून असते यावर्षी खरीप पेरणी हंगामाच्या सुरवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची नगदी पीक म्हणून कापसाच्या पिकास पसंती देऊन खरीप हंगामात कापसाचे विक्रमी लागवड केली होती पेरणीनंतर समाधानकारक पाऊस पडत राहिल्यामुळे कापसाच्या पिकाची वाढ व उत्तम प्रकारे होत होती त्यामुळे शेतकऱ्याने कापसाच्या लागवडीवर हजारो रुपये खर्च केला होता ऑक्टोंबर परतीच्या मुसळधार पावसामुळे कापसाच्या पिकास फटका बसला त्यातच कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाची बोंडे पाने पूर्णत झडून गेली जी काही बोंडे कापसाच्या झाडास लागली होती तेवढीच शिल्लक राहिली पहिल्या कापूस वेचणी नंतर कापसाच्या झाडास बोंडच शिल्लक राहिली नाहीत दरवर्षी कापसाच्या तीन वेचण्या केल्या जातात या वर्षी अतिवृष्टीने पहिल्या वेचणी नंतरच झाडास बोंडच शिल्लक नसल्याचे कापसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली कापसाच्या लागवडीवरल खर्चही कापसाच्या उत्पादनातून निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यामुळे शेतकरी कापसाच्या शेतीवर नांगर फिरवून कापूस शेती तिथून काढून फेकत आहेत अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: