ताज्या घडामोडी

ट्रँकटर पल्टी होऊन २ ऊसतोड कामगारांचा मृत्यू ……

मनोज बिरादार (देगलूर प्रतिनिधी )
मो.९९६०७५७८७१

महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हे कर्नाटक राज्यात ऊसतोडीच्या कामासाठी जात असताना मुखेड तालुक्यातील मौजे हातराळ येथे ट्रॅक्टर उलटून दोघांचा मृत्यू झाला असून ही दुर्देवी घटना शनिवारी दिनांक ७ रोजी रात्री साडे दहा वाजता घडली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा ऊसतोड मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा टाकला आहे.मुक्रमाबाद,ता.मुखेड, जि. नांदेड महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हे कर्नाटक राज्यात ऊसतोडीच्या कामासाठी जात असताना मुखेड तालुक्यातील हातराळ येथे ट्रॅक्टर उलटून दोघांचा मृत्यू झाला असून ही दुर्देवी घटना शनिवारी (ता.सात) रोजी रात्री साडे दहा वाजता घडली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ऊसतोड मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा टाकला आहे.कोरोनाच्या या महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे अनेकांनी मिळेल ती कामे करून आपली उपजिविका चालविण्यासाठी धडपडत आहेत. अशाच नांदेड जिल्ह्यातील मारतळा व इतर ठिकाणचे ऊस तोड मजूर हे आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटक राज्यातील भालकी येथील सारख कारखाण्यावर (एम.एच.२६-बी.सी. ९२४५) या ट्रॅक्टरने जात होते.पण रात्रीच्या प्रवासात मुखेड तालुक्यातील हातराळ येथील महामार्गावर असलेल्या उताराचा अंदाज ट्रॅक्टर चालकास आला नसल्यामुळे भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरचे हेड काही समजण्याच्या आतच पल्टी खाऊन ट्रॅक्टर चालक सुरेश पवार वय २८ व त्याच्या शेजारी बसलेला साहेबराव गायकवाड दोघेही राहणार मारताळा ता. लोहा या दोघांचा ट्रॅक्टरच्या हेडखाली दबुन जाग्यावरच मृत्यू झाला.तर हेड पलटी खाताच ट्रॉलीमध्ये असणारे इतर मजूर हे,उड्या मारल्यामुळे पुढील अनर्थ टळला.दापका गुंडोपंत येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील दापकेकर यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत या अपघातात मृत्यू पावलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी व क्रेनची सोय करून आत दबलेले मृतदेह बाहेर काढले. या अपघातातून बचावलेल्या व इतर मजूरांची सर्व सोय केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: